आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Shares Of 1,998 Stocks On The Bombay Stock Exchange, And The Highest Levels Of 66 Stocks

मुंबई शेअर बाजारात १,९९८ शेअरमध्ये तेजी, ६६ शेअर वर्षभरातील उच्चांकी पातळीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी मुंबई शेअर बाजाराबाहेर गुंतवणूकदार जमा झाले होते. सर्वांचे लक्ष आकड्यांवर होते. - Divya Marathi
सोमवारी मुंबई शेअर बाजाराबाहेर गुंतवणूकदार जमा झाले होते. सर्वांचे लक्ष आकड्यांवर होते.

मुंबई/नवी दिल्ली - मतमोजणीपूर्व अंदाजामध्ये (एक्झिट पोल) मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज समाेर आल्यानंतर सोमवारी देशातील शेअर बाजारात आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या किमतीत जबरदस्त तेजी दिसून येण्याची शक्यता आहे.  सेन्सेक्समध्ये सुमारे सहा वर्षांतील एका दिवसातील सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली आहे. सेन्सेक्स १,४२१.९० अंक (३.७५ टक्के) तेजीसह ३९,३५२.६७ या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये १० वर्षांतील एक दिवसाची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी ४२१.१० अंकांच्या (३.६९ टक्के) तेजीसह ११,८२८.२५ या विक्रमी पातळीवर बंद झाला. 


या आधी १० सप्टेंबर २०१३ रोजी सेन्सेक्समध्ये ७२७.०३ (३.७७ टक्के) अंकांची वाढ झाली होती. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने १४८१.७९ अंकांची वाढ मिळवत ३९,४१२.५६ ही उच्चांकी पातळी गाठली होती, तर निफ्टीने ४३८.०५ अंकांच्या वाढीसह ११,८४५.२० अंकांची नवीन उच्चांकी पातळी गाठली होती. भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

 

एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.३३ लाख कोटींची वाढ
शेअर बाजारात सोमवारी झालेल्या या तेजीमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.३३ लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचा मार्केट कॅप वाढून १५१.८६ लाख कोटी रुपये झाला. हा मागील शुक्रवारी १४६.५८ लाख कोटी रुपये होता. देशांतर्गत बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. या दरम्यान मार्केट कॅप ७.४८ लाख कोटी रुपयांनी वाढला.

 

बाजारात तेजी तरी  १५१ शेअरने एका वर्षातील नीचांकी पातळी गाठली

बाजारातील तेजीमध्ये सोमवारी ६६ शेअरने त्यांच्या ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. यामध्ये बजाज फायनान्स, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एसआरएफ, टायटल आणि पीव्हीआर यांचा समावेश आहे. तर इतर १५१ शेअरने एका वर्षातील नीचांकी पातळी गाठली. यामध्ये बायोकॉन, बिनानी इंडस्ट्रीज, ज्युबिलेंट आणि मॉन्सेंटो यांचा समावेश आहे.

 

रुपयामध्ये दोन महिन्यांतील सर्वाधिक तेजी, ४९ पैसे वाढ
शेअर बाजारातील तेजीदरम्यान सोमवारी रुपया ४९ पैसे मजबुतीसह बंद झाला. एका अमेरिकी डॉलरची किंमत ६९.७४ झाली. ही रुपयातील मागील दोन महिन्यांतील सर्वाधिक तेजी आहे. गेल्या शुक्रवारी डॉलरची किंमत ७०.२३ होती. वास्तविक कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याचाही रुपयावर परिणाम झालेला आहे. कच्च्या तेलाची किंमत ०.४२ टक्क्यांच्या वाढीसह ७२.५१ डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...