आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सचा गुंतवणूकदारांना 131% रिटर्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 52 आठवड्यांच्या किमान स्तरावर पोहोचल्यानंतर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स उसळले
  • तीन व्यावसायिक दिवसांत एअरटेलच्या समभागांनी 21.12 टक्के परतावा दिला

मुंबई : व्होडाफोन आयडियाचे समभाग १५ नोव्हेंबरला २.६१ रु. प्रति समभागावर पोहोचले होते, हा ५२ आठवड्यांत कंपनीच्या समभागांचा नीचांकी स्तरही आहे. १९ नोव्हेंबरला कंपनीच्या एका समभागाची किंमत ६.०२ रु. आहे. या हिशेबाने तीन व्यावसायिक दिवसांत व्होडाफोन आयडियाच्या समभागांनी १३०.६५ टक्के परतावा दिला आहे. याच पद्धतीने भारती एअरटेलबाबत बोलायचे झाल्यास १५ नोव्हेंबरला कंपनीचा समभाग एका वेळी ३६२.६५ रु. प्रति समभागावर होता आणि १९ नोव्हेंबरला कंपनीच्या एका समभागाची किंमत ४३९.२५ रु. आहे. त्यामुळे तीन व्यावसायिक दिवसांत एअरटेलच्या समभागांनी २१.१२ टक्के परतावा दिला आहे. दोन्ही दूरसंचार कंपन्यांनी एक डिसेंबरपासून मोबाइल शुल्क वाढीची घोषणा केली आहे. याकडे बाजाराने सकारात्मक पाऊल मानले आहे. दोन्ही कंपन्यांच्या समभागांत १५ नोव्हेंबरपासून मोठी तेजी पाहावयास मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही कंपन्यांनी सरकारच्या थकीत रकमेसाठी तिमाही निकालात तरतूद केली आहे. या कारणास्तव व्होडाफोन आयडियाला एका तिमाहीत सर्वात जास्त तोटा झाला, तर भारती एअरटेलला सुमारे २३,००० कोटी रु. तोटा झाला.रिलायन्स जिओचे शुल्क अन्य दूरसंचार कंपन्यांपेक्षा ३०% कमी

१०% शुल्कवाढीमुळे महसुलात ३.५८ हजार कोटींची वाढ शक्य


तज्ञांनुसार, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलद्वारे शुल्कवाढीची घोषणा एक चांगले पाऊल आहे. मात्र, याचा परिणाम चौथ्या तिमाहीतच पाहायला मिळेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुल्कातील १० टक्के वाढीमुळे कंपन्यांच्या महसुलात २.८६ हजार कोटी रु. ते ३.५८ हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. मात्र, एजीआरच्या देयकाच्या तुलनेत हे कमी आह या कंपन्यांना सरकारच्या दिलाशाची आशा करावी लागेल.मोबाइल शुल्कात लवकरच वाढ होईल : रिलायन्स जिओ
व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलनंतर जिओनेही शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी व्होडाफोन व आयडिया वाढलेल्या महसुलाचा उपयोग एजीआर देयकासाठी करतील. रिलायन्स जिओचे तसे नसेल.व्होडाफोन, एअरटेलच्या तुलनेत रिलायन्स जिओचे शुल्क ३०% कमी आहे, याचा अर्थ शुल्क वाढवल्यानंतरही रिलायन्स जिओचे शुल्क सर्वात कमी कायम राहील.कॉल ड्रॉप आणि कनेक्टिव्हिटी समस्या सोडवण्यासाठी मोठे कष्ट


दूरसंचार ऑपरेटर डिसेंबरच्या सुरुवातीपासून शुल्कात २० टक्क्यांची वाढ करू शकतात. डेट, एजीआर, स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक आणि नेटवर्क अपग्रेड करण्यासह अनेक मुद्दे लक्षात घेऊन बहुतांश गुंतवणूकदार या आकड्यावर पोहोचले आहेत. ३-४ वर्षांपूर्वी प्रतिग्राहक १८४ रु. दिले जात होते, आता घटून १२५ रुपयांवर आले आहे. कॉल ड्रॉप आणि कनेक्टिव्हिटीसारखे मुद्दे सोडवण्यासाठी ऑपरेटर कष्ट घेत आहेत.
 

मंगळवारी सेन्सेक्समध्ये १८६ अंकांची तेज, निफ्टीत ५६ अंकांची वाढ पाहावयास मिळाली
 
३० समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स आज १८६ अंकांच्या उसळीसह ४०,४७० वर बंद झाला. ५० समभागांचा निफ्टीही सुमारे ५६ अंकांच्या उसळीसह ११९४० वर बंद झाला. सेन्सेक्सवर भारती एअरटेलच्या समभागात सर्वात जास्त उसळी आली. निफ्टीवरही इन्फ्राटेल आणि भारती एअरटेलचे समभाग टॉप गेनर राहिले. लाभाच्या शेअर्समध्ये अॅक्सिस बँक, पाॅवरग्रिड, टेक महिंद्रा, भारतीय स्टेट बँक, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस आहेत. याउलट येस बँक २.६६%, महिंद्रा अँड महिंद्रा २.१९% आणि टाटा स्टील २.०२% घसरले. टीसीएस, टाटा मोटर्स आणि हीरो मोटोकॉर्पच्या समभागांतही घसरण राहिली. अन्य आशियाई बाजारांत शांघाय आणि हाँगकाँगमध्ये शेअर बाजारात वाढ, टोकियो आणि सेऊल बाजारात घसरण नोेंदली आहे.