आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharjeel Imam। JNU Student Sharjeel Imam। Citizenship Amendment Act। Aligarh And Assam Police Registered Case Against Sharjeel

जेएनयूचा विद्यार्थी शर्जीलच्या ‘भारत के टुकड़े’ वक्तव्यावर भडकले असदुद्दीन ओवैसी, म्हणाले- भारत कोंबडी नाहीये, तुकडे करायला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शर्जील इमामने 16 जानेवारीला अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात सभा घेतली होती
  • शरजीलचा व्हिडिओ व्हायरल, त्यात तो पूर्वोत्तर आणि असामला भारतापासून वेगळे करण्याबाबत बोलत आहे
  • अलीगड एसएसपी म्हणाले- शर्जीलविरोधात गुन्हा दाखल, लोकेशन शोधत आहोत; असाममध्येही देशद्रोहाचा गुन्हा दाखल

अलीगड- जेएनयू विद्यार्थी शर्जील इमामच्या भारताचे तुकडे वक्तव्यावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी तीव्र शब्दात निंदा केली आहे. औवेसींनी शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारत कोंबडी नाही की, मान कापल्यावर तुकडे होतील. हे एक राष्ट्र आहे. कोणीच भारत किंवा भारताच्या एखाद्या भागाला तोडू शकत नाही. असे नर्थक वक्तव्य खपवून घेतले जाणार नाहीत.

अलीगड-असाममध्ये शर्जीलविरोधात गुन्हा दाखल

शर्जील दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएएविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा आयोजक आहे. अलीगडच्या सभेतील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अलीगडमध्ये शर्जीलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला.

अलीगड एसएसपी आकाश कुलहरी यांनी सांगितले की, "जेएनयूमध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा विद्यार्थी शर्जीलने 16 जानेवारीला एएमयूमध्ये सभा घेतली होती. या दरम्यान शर्जीलने देशविरोधी वक्तव्य दिले होते. भाषणाच्या व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शर्जीलवर अलीगडशिवाय असाममध्येही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपा नेत्यांनी ट्वीट करुन विरोध केला

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट करुन शर्जीलचा विरोध केला.

‘सेना के लिए असम का रास्ता रोकें’

शर्जील म्हणाला होता की, "तुम्हाला माहित आहे का असामच्या मुस्लिमांसोबत काय होत आहे? एनआरसी आधीपासूनच तिथे लागू आहे, तेथील मुस्लिमांना अटक केले जात आहे. पुढील सहा आठ महिन्यात बंगलमधल्या मुस्लिमानाही मारले जाईल. हिंदू असो किंवा मुसलमान, जर आपल्याला तेथील मुस्लिमांना मदक करायची असेल तर आपल्याला भारतीय लष्कराचा रास्ता अडवावा लागेल.