आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातू तैमूरच्या सुरक्षेविषयी आजीला वाटतेय चिंता, सैफ अली खानला घरी बोलावून दिल्या सुचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. शर्मिला टागोर आपला नातू तैमूरच्या सिक्योरिटीसाठी टेंशनमध्ये आहे. पटौदी कुटूंबाशी संबंधीत असलेल्या सूत्रांनुसार, शर्मिला यांनी तैमूरच्या सुरक्षेविषयी बोलण्यासाठी सैफ अली खानला घरी बोलावले होते. शर्मिला टागोर या सैफ किंवा सोहाच्या वयक्तिक आयुष्यात कधीच दखल देत नाहीत. पण तैमूरविषयी त्यांना जास्त काळजी वाटते. तैमूर ज्या वेगाने लाइमलाइटमध्ये आला आहे, ते पाहून तैमूरची सुरक्षा वाढवण्यात यावी असे वाटते. कारण असे केल्याने तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो. 


तैमूरच्या प्रसिध्दी अशी की, त्याच्यासारखी डॉल बाजारात 
नुकतीच तैमूर डॉल बाजारात आली आहे. ही डॉल घेऊन सारा एका टीव्ही शोमध्ये पोहोचली होती. साराचा 'केदारनाथ' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. ती डॉल घेऊन या चित्रपटाचे प्रमोशन करतेय. साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे डोळे वडिलांसारखे आहेत. हे पाहून तिला चांगले वाटते. तैमूरची प्रसिध्दी पाहता सर्व कुटूंबच त्याच्या सुरक्षेविषयी चिंतेत असल्याचे सारानेही मान्य केले. 

 

मीडियाचा फेव्हरेट आहे तैमूर 
सैफ आणि करीनाचा लाडका तैमूर मीडियाचा आवडता आहे. तो जिथे जातो, तिथे मीडिया हजर असते. तैमूरही फोटोग्राफर्सला पोज देतो. नुकताच एक क्यूट व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये तैमूर कॅमेरा पाहून हाय म्हणताना दिसतोय. यापुर्वी एक अनोळखी व्यक्ती तैमूरजवळ आला होता आणि सेल्फी घेत होता. त्याला दूर करणे नैनी सावित्रीला कठीण झाले यानंतर सैफ करीनाने तैमूरचे फोटो न काढण्याची अपील केली होती. 

 

वडील सैफ म्हणाले होते की, तैमूरला बोर्डिंगमध्ये पाठवणार 
आपल्या दोन वर्षांच्या मुलाला मिळत असलेल्या अटेंशनमुळे करीना आणि सैफ चिंतेत राहतात. सैफ तर एकदा म्हणाला होता की, मी तैमूरचा बचाव करण्यासाठी त्याला बोर्डिंगमध्ये पाठवेल. याविषयी करीनाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मला असे वाटत नाही. तिला वाटते की, तैमूरने स्वतंत्र्य आकाशात उडावे, त्याने कैद असू नये. 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...