आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैराश्य आणि रागावर नियंत्रण करण्यासाठी करा शशांकासन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कृती : सुरुवातीला वज्रासनामध्ये बसावे. दोन्ही पाय समोर ठेवून बसावे. आता उजवा पाय गुडघ्यातून दुमडावा. तसेच डावासुद्धा गुडघ्यातून दुमडावा. आता दोन्ही पायांच्या तळव्यावर बसावे. आता शरीराला रिलॅक्स करावे. आता दोन्ही हात वर करावेत आणि शरीराचा वरील भाग अलगदपणे खाली आणा. शक्य झाल्यास डोके जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. तसेच दोन्ही हात जमिनीवर ठेवावेत. जितके पाठीला स्ट्रेच देता येईल तितके स्ट्रेच द्यावे. या स्थितीत डोळे बंद करावे व काही सेकंद या स्थितीत राहावे. शरीराला (अप्पर बॉडी) वरती आणताना घाई करू नये.

  • फायदे

- मेंदूत रक्त परिसंचरण बरे करते. - स्मृती वाढवते, विद्यार्थ्यांनी दररोज करावे. - आतडे, यकृत हे स्वादुपिंडाच्या आजारासाठी फायदेशीर आहे. - बद्धकोष्ठता दूर करते. - हे आसन ओटीपोट, कंबर आणि नितंबातील चरबी कमी करते मूत्रपिंडांना शक्ती प्रदान करते. - मानसिक ताण, क्रोध, चिडचिडेपणा इत्यादी मानसिक आजार नियमितपणे आसन केल्यामुळे दूर होतात.

  • खबरदारी

- जर आपल्याला मान दुखणे, व्हर्टीगो, स्लिप डिस्क, उच्च रक्तदाब समस्या असेल तर असे करू नका.