आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी महिलेशी लग्न करणारे कपूर कुटुंबाबातील पहिले व्यक्ती होते शशी, 5 वर्षे मोठ्या जेनिफरसोबत नाते जोडण्यासाठी वहिनीने केली होती मदत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शशि कपूर यांची आज 81वी बर्थ एनिवर्सरी आहे. 18 मार्च, 1938 मध्ये जन्मलेले बलबीर राज कपूर उर्फ शशि कपूर यांनी 1944 मध्ये आपले करियर पृथ्वी थिएटरच्या 'शकुंतला' नाटकाने सुरु केले. राज कपूर यांचा पहिला चित्रपट 'आग' आणि तिसरा चित्रपट 'आवारा' मध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका केल्यानंतर शशि यांनी यश चोपड़ाच्या डायरेक्शनमध्ये बनलेली फिल्म 'धर्मपुत्र' ने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. शशि कपूर त्यांच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ती होते ज्यांनी परदेशी महिलेशी लग्न केले.  

5 वर्षे मोठ्या जेनिफरसोबत केले होते शशि कपूर यांनी लग्न...
पृथ्वी थिएटरमध्ये पन्नास रुपये मासिक वेतनावर काम करून शशी यांनी स्टेजवर काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यावेळी भारत दौ-यावर आलेल्या 'शेक्सपिएराना' या नाटक टीममध्ये ते सामील झाले. यादरम्यान या नाटक टीमचे संचालक मिस्टर कँडल यांची मुलगी जेनिफरसोबत त्यांनी अनेक नाटकांत काम केले. शेक्सपिअरचे मुख्य नाटक 'द टेम्पस्ट'मध्ये मिरांडाची भूमिका साकारताना जेनिफर आणि शशी यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1957मध्ये शशी यांनी जेनिफर थिएटर ग्रुपसोबत जाऊन सिंगापूरला नाटक सादर केले. यावेळी दोघांची जवळीक आणखीच वाढली. यादरम्यान शशी यांनी जेनिफर समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ऊटीमध्ये एका नाटकावेळी शशी यांची वहीणी गीता बाली यांनी जेनिफरला आपली पसंती दर्शवली आणि 1958मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी शशी 20 वर्षांचे तर जेनिफर 25 वर्षांच्या होत्या.

एकेकाळी 21 वर्षे लहान नीतू सिंह होत्या हीरोइन, नंतर झाल्या सून... 
शशि कपूरने आपल्या करियरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केले. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नीतू सिंह या होत्या. त्या वयाने शशी कपूर पेक्षा 21 वर्षांनी लहान होत्या. नीतू सिंहने त्यांच्यासोबत ‘दीवार’, 'काला पानी', 'दूसरा आदमी', 'कभी-कभी' ‘हीरालाल-पन्नालाल’ आणि ‘काला-पत्थर’ अशा चित्रपटांत काम केले. मजेशीर गोष्ट म्हणजे ऋषि कपूरयांच्यासोबत लग्न झाल्यानंतर नीतू सिंह त्यांची सून झाल्या. 

पहिला पगार होता 75 रुपये... 
1953 मध्ये शशी कपूर थिएटरसोबत जुळले होते. त्यांना पहिला पगार म्हणून 75 रुपये मिळाले होते. त्याकाळात ही मोठी रक्कम होती.

मोठ्या भावाला सांता क्लॉज मानायचे शशि कपूर...
शम्मी कपूरने सांगितले होते की, ''शशि माझ्यापेक्षा 7 वर्षांनी कल्हण होता आणि त्याला जेव्हाही काही हवे असेल तेव्हा तो माझ्याकडे नक्की यायचा." तसेच शशि कपूरनेही सांगितले होते की, "जेव्हा मी आणि जेनिफर एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो तेव्हाही शम्मीने आम्हाला खूप सपोर्ट केला होता. एकदा तर शम्मीने मला एयर तिकीटही घेऊन दिले होते, जेव्हा जेनिफर कलकत्ता सोडणार होती आणि मला तिला भेटायला जायचे होते. मी शम्मीला सांता क्लॉज सारखे मानायचो.

आईला होती खऱ्या नावाची चीड, त्यामुळे म्हणायच्या शशी... 
शशीचे पहिले नाव बलबीर राज कपूर होते, पण ओळख मिळाली शशी या नावाने. त्यांच्या सावत्र आजीने त्यांना बलबीर राज कपूर हे नाव दिले होते. पंडिताच्या सांगण्यावरुन त्यांनी हे नाव ठेवले होते. शशी कपूर यांच्या मातोश्रींना या नावाची चिड होती. त्यामुळे त्या त्यांना बलबीर ऐवजी शशी या नावाने हाक मारु लागल्या. अशा प्रकारे बलबीर राज कपूर हे शशी कपूर झाले.

पहिले इंडियन इंटरनॅशनल स्टार...  
हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. त्यांनी जेम्स आइवरी ('बॉम्बे टॉकीज' आणि 'हीट एंड डस्ट') आणि स्टेफन फ्रियर्स ('सैमी' आणि 'रोजी गेट लेड') यांच्यासोबत काम केले होते. 1963 ते 1998 यादरम्यान त्यांनी 10 पेक्षाही जास्त इंग्लिश फिल्म केल्या. 

मोठा भाऊ रागात म्हणाला होता टॅक्सी...
शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. अवघे कपूर घराणे त्यांना ‘अंग्रेज कपूर’ नावाने पुकारायचे. कारण शशी यांचे शिस्तबद्ध जीवन. इतकेच नाही तर शशी कपूर दिवसभरात 15 ते 18 तास शूटिंग करायचे. यामुळेच राज कपूर त्यांना ‘टॅक्सी कपूर’ नावाने बोलवायचे. यामुळे ते राज कपूर यांची फिल्म 'सत्यम शिवम सुंदरम' ला पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते. 
 

बातम्या आणखी आहेत...