Home | National | Other State | Shashi Tharur injured during pooja in temple

पुजेदरम्यान झालेल्या अपघातात शशि थरूर जखमी, डोक्याला पडले 6 टाके...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 01:31 PM IST

शशी थरुर सलग दोनवेळा तिरुअनंतपुरम येथून खासदार आहेत

  • Shashi Tharur injured during pooja in temple

    तिरुअनंतपुरम(केरळ)- काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस उमेदवार शशी थरुर मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना पडले. या दुर्घटनेत थरुर यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांना 6 टाके पडले आहेत. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.


    तिरुअनंतपुरम येथील मंदिरात तुलाभराम पूजा करत असताना, पूजेच्या विधीचा एक भाग म्हणून ते फळ आणि मिठाईंच्या तराजूत तुला करत होते. त्यावेळी ते पडले आणि त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. तुलाभरम पूजा केरळमधील मोजक्याच मंदिरात केली जाते. वजनाइतकी मिठाई किंवा फळे देवाला अर्पण केली जातात.


    शशी थरुर हे माजी केंद्रीय मंत्री असून, केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार आहेत. यावेळेसदेखील काँग्रेसने तिरुअनंतपुरमची जबाबदीरी त्यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यांच्याविरोधात राजशेखरन रिंगणात आहेत. राजशेखरन यांनी नुकतेच मिझोरमच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. शशी थरुर सलग दोनवेळा तिरुअनंतपुरम येथून खासदार आहेत. त्यामुळे यंदा शशी थरुर हॅटट्रिक मारतात का नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. केरळमध्ये एकाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहेत. 23 एप्रिलला मतदान पार पडणार असून, 23 मेला निकाल लागणार आहे.

Trending