आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना वेगळा अनुभव मिळावा म्हणून मार्च महिन्यापासून मातीच्या ताट-वाटीत नाष्टा व जेवण दिले जाणार आहे. गोरखपूर, लखनऊ, आग्रा आणि वाराणसीसह ईशान्येकडील सर्व रेल्वेस्थानकांवर ही व्यवस्था सुरू केली जाईल. यासाठी कुंभारांच्या गटांशी संपर्क केला जात आहे. रेल्वे बोर्ड आता वाराणसी आणि रायबरेली स्टेशनवरून प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. सर्वकाही ठीक राहिले तर देशभरातील सर्व ए आणि बी श्रेणीच्या ४०० स्टेशनवर ही व्यवस्था लागू करण्यात येईल.
माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी स्टेशनवर मातीच्या भांड्यात चहा देण्याची व्यवस्था सुरू केली होती, परंतु प्लास्टिकचे कप आणि प्लेट आल्याने मातीच्या भांड्याचा ट्रेंड मागे पडला. खादी ग्रामोद्योग बोर्डाने दिलेल्या सल्ल्यानंतर हा उपक्रम सुरू केला जात आहे. या उपक्रमातून पारंपरिक कुंभार व्यावसायिकांना रोजगार मिळणार आहे. मातीच्या भाड्यांचे उत्पादन वाढताच वाराणसी आणि रायबरेली स्थानकांवर प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली जाणार असल्याचे एडीजी स्मिता वत्स शर्मा यांनी म्हटले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आयआरसीटीसीचे सीएमडी एम. पी. मल्ल म्हणाले की, इको-फ्रेंडली प्लेटमध्ये जेवण वाढण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी दररोज जवळपास २० लाख अॅल्युमिनियम केस रोलची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सर्व गाड्यांमध्ये इको-फ्रेंडली प्लेटमध्ये जेवण वाढण्यासाठी कालावधी लागणार आहे. सध्या राजधानी-शताब्दीसह इतर गाड्यांमध्ये इको-फ्रेंडली प्लेटमध्ये जेवण दिले जाणार आहे.
ईशान्येकडील सर्व स्थानके प्लास्टिकमुक्त होणार
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ईशान्य विभागातील सर्व स्टेशन्सवर प्लास्टिक आणि कागदाच्या भांड्यांचा उपयोग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाराणसी आणि रायबरेली रेल्वेस्टेशनना लवकरात लवकर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.