आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर या कारणांमुळे कपिल शर्मावर भडकले शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षीने केला समजावण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: कॉमेडियन कपिल शर्मा सध्या कामातून ब्रेक घेऊन डिप्रेशनवर उपचार घेत आहे. याच कारणांमुळे तो सध्या सोशल मीडियापासून दूर आहे. एकेकाळी कपिल शर्माच्या मिमिक्रीमुळे अनेक लोक हसत होते. परंतू अनेक सेलेब्स कपिलच्या मिमिक्रीमुळे नाराजही होत होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपुर्वी त्यांची कपिल शर्मावरील नाराजी व्यक्त केली. एका मुलाखती दरम्यान शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, "मिमिक्री मर्यादेत राहून केली तर काहीच हरकत नाही, परंतू कपिलने त्याच्या शोमध्ये सर्व लिमिट क्रॉस करुन माझी खिल्ली उडवली होती."

 

माझ्या मुलीने समजावूनही कपिलने ऐकले नाही
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की - "माझी मुलगी सोनाक्षी सिन्हा त्याला अनेक वेळा म्हणाली की, असे करु नको. परंतू तरीही त्याने ऐकले नाही." कपिल शर्मा आपल्या शोमध्ये भोजपुरी KBC ला शत्रुघ्न सिन्हा बनून होस्ट करायचा. यामध्ये तो शत्रुघ्न सिन्हाची मिमिक्री करायचा आणि आलेल्या पाहूण्यांना कंटेस्टंट बनवायचा.

 

शत्रुघ्न यांनी सांगितले 
"एका मिमिक आर्टिस्टने कधीच विसरु नये की, तो ज्याची नक्कल काढतो, याला तो त्याचे काम डेडिकेट करतो. एका कॉमेडियनने मिमिक्री करताना कधीच लिमिट क्रॉस करु नयेत. तसेही मिमिक्री ही स्टेजपर्यंतच योग्य वाटते, ती रस्त्यावर किंवा संसदेपर्यंत आणू नये."

 

कपिलला बदलायची आहे लाइफस्टाइल 
कपिल शर्माने काही काळापुर्वी ट्वीट करुन सांगितले होते की, तो आता आपली लाइफस्टाइल बदलण्याचा प्रयत्न करतोय. फॅन्ससोबत बोलताना कपिल म्हणाला होता की, "लवकरच जुन्या शेपमध्ये आल्यानंतर माझा प्रोफाइल पिक्चर बदलेल. सध्या माझ्याविषयी जे काही बोलले जातेय, त्यावर दुर्लक्ष करुन मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. माझे काम माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे."

 

 

 

बातम्या आणखी आहेत...