Home | News | Shatrughan Sinha Birthday: life facts

काही दशकांपुर्वीच ज्योतिषांनी केली होती शत्रुघ्न यांची भविष्यवाणी, कुंडली राजयोग असल्याचे सांगितले होते

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:00 AM IST

पंडित नेहरूंपासून ते लालू यांच्यापर्यंत कुंडली पाहिल्या आहेत...

 • Shatrughan Sinha Birthday: life facts

  एन्टटेन्मेट डेस्क. बॉलिवूडमधील एकेकाळचे स्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा आज (9 डिसेंबर) वाढदिवस आहे. चित्रपट कारकिर्द गाजवल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला. राजकारणातही ते यशस्वी राहिले. त्यांचा हा भविष्यकाळ एका ज्योतिषाने काही दशके आधीच वर्तवला होता. पाटण्यातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित विष्णूकांत शास्त्रींनी शत्रुघ्न सिन्हा यांची कुंडली पाहून म्हटले होते, की या मुलाच्या आयुष्यात राजयोग आहे.

  कोणते भविष्य वर्तवले होते पंडित शास्त्रींनी...
  - शत्रुघ्न सिन्हा यांनीच हा किस्सा एकदा सार्वजनिक केला होता. शत्रुघ्न सिन्हा यांचे म्हणाले होते, 'मी माझ्या वडिलांसह पंडितजींकडे गेलो होतो. त्यांनी कुंडली आणि हात पाहिल्यावर म्हटले होते की, हा खूप मोठा माणूस होईल. याचे नोकरचाकरसुद्धा विमानातून प्रवास करतील.' पंडित विष्णुकांतजी यांच्या भाकितावर त्या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांना राग आला होता.


  - शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, 'त्या वेळी मी खूप लहान होतो. माझे वडील बी.पी.सिंह आम्हा चारही भावांना घेऊन पंडितजींच्या घरी गेले होते. त्यांनी माझा हात पाहून म्हटले होते की, याच्या दहाही बोटांमध्ये शंख आहे. याचा तर राजयोग आहे, हा खूप पैसा कमावणार आणि याचे नावही खूप मोठे होईल.'


  - शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, त्यावेळी मला वाटले पंडितजी आपली चेष्टा करत आहेत. त्यामुळे मला तेव्हा त्यांच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले होते.

  शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा
  - राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक शत्रुघ्न सिन्हा यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभा खासदार असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. जानेवारी 2003 ते ऑगस्ट 2004 या काळात ते मंत्री होते.
  - यानंतर 2009 ला 15व्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि लोकसभेत गेले. 2009 ते 2014 आणि 2014 मध्ये ते पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असल्यामुळे मंत्रीपदाची त्यांना आपेक्षा होती.
  - बिहारची राजधानी पाटण्यात जन्मलेल्या सिन्हा यांना2015 ;च्या अखेरीस झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करावा अशी इच्छा होती, मात्र तीही अपूर्ण राहिली. त्यानंतर अनेकदा त्यांनी पक्षाला आरसा दाखवण्याचे काम केले आहे.
  - मात्र पंडित विष्णूपंत शास्त्रींनी सांगितलेले भविष्य शत्रुघ्न सिन्हा यांनी खरे करुन दाखवले आहे.

  पंडित नेहरूंपासून ते लालू यांच्यापर्यंत कुंडली पाहिल्या आहेत...
  - पंडित विष्णुकांत मिश्रा यांच्याबाबत असे सांगितले जाते की, त्यांच्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू ते लालू प्रसाद यादव पर्यंतची कुंडली होती. लालू प्रसाद जेव्हा पाटणा विद्यापीठात छात्र संघाचे नेता होते तेव्हा त्यांच्याकडे जाणे-येणे होते. पंडित विष्णुकांत मिश्रा यांनी लालू प्रसाद यांच्याबाबत 1965 मध्ये राजयोगाची भविष्यवाणी केली होती. यानंतर लालू प्रसाद पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते.

  शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणा विज्ञान कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आले. येथे त्यांना यश मिळाले.

  शत्रुघ्न सिन्हा स्वतःला मानतात पुणेकर
  शत्रुघ्न सिन्हा यांचे शिक्षण पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये झाले. त्यांचा विद्यार्थीदशेतील बराच काळ पुण्यात गेला आहे.
  - यावर्षी झालेल्या पुणे फेस्टिव्हलचे शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी विद्यार्थिदशेतल्या पुण्यातील वास्तव्याला उजाळा दिला होता.
  ते म्हणाले होते, ‘जो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाढला, पुण्याच्या देवभूमीत आला त्या शत्रुघ्नला कधीही भाषेचा अडसर नाही.’ पुणे हे माझे पहिले प्रेम असल्याचे सांगत शत्रुघ्न म्हणाले होते, मी पुण्याचा वफादार आहे.

  - शत्रुघ्न यांना तीन मुले आहेत. लव-कुश ही जुळी मुले तर सोनाक्षी सिन्हा ही त्यांची मुलगी आहे.
  - सोनाक्षीने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Trending