Home | News | Shatrughan Sinha life facts, birthday

रिना रॉयसोबत शत्रुघ्न सिन्हा यांचे होते 7 वर्षे अफेअर, पत्नीसाठी संपवले होते संबंध

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:00 AM IST

शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रिना...

 • Shatrughan Sinha life facts, birthday

  मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज 73 वर्षांचे झाले आहेत. 9 डिसेंबर 1945 रोजी पाटण्यात जन्मलेले शत्रुघ्न सिन्हा राजकिय क्षेत्रातसुध्दा सक्रिय आहेत. त्यांनी देव आनंद यांच्या 'प्रेम पुजारी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पारस (1971), दोस्त (1974), काला पत्थर (1979), दोस्ताना (1980) सारख्या चित्रपटांमधून आपल्या अनोख्या अभिनयाचा झेंडा रोवणा-या शत्रुघ्न यांचे आयुष्यसुध्दा खूप चर्चित राहिले आहे. विशेषतः पूनम चंडीरामणीसोबत लग्न आणि रिना रॉयसोबतचे अफेअर बी टाऊनमधील चर्चेचा विषय ठरले होते

  .

  7 वर्षे होते रिना रॉयसोबत संबंध...
  शत्रुघ्न यांनी 1980मध्ये माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणी (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत शत्रुघ्न यांनी कबुली दिली होती, की ते सात वर्षे रिनासोबत रिलेशनशिपमध्ये होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.


  शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रिना...
  बॉलिवूडमध्ये रिना यशोशिखरावर होत्या, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत होते. काही कामानिमित्त रिना लंडन गेल्या होत्या. त्यावेळी शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. रिना यांना या लग्नाविषयी माहित झाल्यानंतर त्या भडकल्या आणि भारतात येऊन याचे उत्तर मागितले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरसुध्दा शत्रुघ्न रिना यांना भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत झाला. दोघांचे नाते का संपुष्टात आले, याचे उत्तर आजही कुणाकडे नाहीये.

  7 वर्षे टिकले नाते...
  एका मासिकाच्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी रिनासोबतच्या नात्याची कबुली देताना म्हटले होते, 'रिनासोबत माझे नाते पर्सनल आणि इंटेन्स होते. लोक म्हणतात, की लग्नानंतर माझ्या रिनाविषयीच्या भावना बदलल्या. परंतु माझ्या मते त्या वाढल्या आहेत. मी नशीबवान आहे, की तिने तिच्या आयुष्यातील 7 वर्षे मला दिले.'


  रिना यांच्या आईची इच्छा, रिना यांनी शत्रुघ्न यांची दुसरी पत्नी बनावे...
  रिना रॉय यांच्या आई इच्छा होती, की त्यांच्या मुलीने शत्रुघ्न सिन्हा यांची दुसरी बनावे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, 'मी देवाकडे प्रार्थना करते, की शत्रुघ्न यांनी माझ्या मुलीला दुसरी पत्नी म्हणून स्वीकारावे. ते तिच्यावर प्रेम करत नाहीत, तिला मुर्ख मानतात. मात्र रिनाला वाटत होते, की हे प्रेम आहे. मी तिला सांगितले होते, की ही चूक आहे. परंतु तिने ऐकले नाही.'


  लग्नानंतरसुध्दा रिनासोबत होते शत्रुघ्न यांचे संबंध...
  एका मुलाखतीत शत्रुघ्न यांच्या पत्नी पूनम यांनी सांगितले होते, 'जेव्हा मला दोघांच्या अफेअरविषयी माहित झाले तेव्हा मी त्यांच्या या गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. परंतु शत्रुघ्न यांना अशा मुलीसोबत लग्न करायचे नव्हते, जिच्यावर त्यांचा विश्वास नाही. मला माहित होते, की दोघांचे लग्नानंतरसुध्दा संबंध होते.'


  सर्वकाही विसरून निभावले पत्नीचे कर्तव्य...
  70च्या दशकात शत्रुघ्न आणि रिना यांचे अफेअर बॉलिवूडमधील चर्चेचा विषय होता. शत्रुघ्न यांची पत्नी पूनमसुध्दा दोघांच्या अफेअरच्या बातम्या ऐकून दु:खी व्हायच्या. त्यांनी शत्रुघ्न यांना खूप समजावले. शत्रुघ्न यांच्यासाठी प्रेम आणि पत्नी यांपैकी एकाची निवड करणे कठीण होते. दोघांच्या कुटुंबीयांनी शत्रुघ्न यांना समजावले. तेव्हा कुठे शत्रुघ्न यांनी रिनाला सोडून पूनमला निवडले. त्यानंतर त्यांनी रिनाला दुर्लक्षित केले. अशाप्रकारे 7 वर्षांच्या या नात्याचा अंत झाला आणि रिना-शत्रुघ्न विभक्त झाले.

Trending