आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होणाऱ्या पत्नीला पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटले होते शत्रुघ्न सिन्हा, समोरच्या सीटवर बसलेल्या पूनम यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण नाही झाली हिम्मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये पोचले होते. यादरम्यान त्यांची पत्नी पूनम यांनी आपल्या आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेयर केला. रविवारी झालेल्या या एपिसोडमध्ये कपिल शर्मा, शत्रुघ्न आणि पूनम यांना हसत खेळात प्रश विचारत होता. यावेळी पूनम सिन्हा यांनी खुलासा एल की, पहिल्यांदा त्यांची आणि शत्रुघ्न सिंह यांची भेट कशी झाली होती.  

 

अशी सुरु झाली होती ही प्रेमकहाणी...
पूनम यांनी सांगितले, "आम्ही पहिल्यांदा एकमेकांना पटना ते मुंबईच्या ट्रेन जर्नीदरम्यान भेटलो होतो. आमचे बर्थ समोरासमोरच होते. आम्ही दोघेही रडत होतो. शत्रुघ्न हे आपल्या आई वडिलांपासून दूर होत होते आणि माझ्या आईने मला रागावले होते. पूर्ण जर्नीदरम्यान शत्रुजी माझ्याशी बोलण्याचे कारण शोधात होते. एवढेच नाही तर एकदा त्यांनी मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. मग ट्रेन एका बोगद्यातून जात होती तेव्हा त्यांनी कसाबसा माझ्या पायाला स्पर्श केला. पण ते एवढे घाबरलेले होते की, ते मग पूर्ण प्रवासात  नाहीत". 

 

मुलगा तर गुंड्यासारखा दिसतो....
एक आणखी किस्सा शेयर करत पूनम यांनी सांगितले की, "जेव्हा शत्रुघ्न यांचे भाऊ राम सिन्हा आणि डायरेक्टर एनएन सिप्पी त्यांचे स्थळ घेऊन माझ्या घरी आले. तेव्हा आई त्यांचा फोटो पाहून भडकली आणि म्हणाली हा तर गुंड्यासारखा दिसतो. याच्या चेहऱ्यावर किती डाग आहेत. आई म्हणाली, कुठे माझी दुधासारखी गोरी मुलगी आणि कुठे हा मुलगा, तो पण चोराची अक्टिंग करतो. असे म्हणत आईने यांचे स्थळ रिजेक्ट केले. मात्र नंतर माझे पेरेंट्स तयार झाले होते". 

 

38 वर्षांपासून एकत्र आहेत शत्रुघ्न आणि पूनम...
9 जुलै, 1980 ला शत्रु सरांनी अभिनेत्री पूनम चंदिरामानी यांच्यासोबत लग्न केले होते. ही ती वेळ होती जेव्हा शत्रुघ्न यांचे नाव रीना रायसोबत जोडले जायचे. एका इंटरव्यूमध्ये त्यांनी सांगितले होते की, रीनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. महत्वाची गोष्ट हीआहे की, दुसऱ्या एका इंटरव्यूमध्ये शत्रुघ्न सरांची वाइफ पूनम यांनी सांगितले होते की, त्यांना आपले पती आणि रीना यांच्या अफेयरबद्दल पूर्ण कल्पना होती. 

 

बातम्या आणखी आहेत...