आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापटना(बिहार)- जेष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामिल होणार आहेत. गुरूवारी यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. पण, त्यांनी स्पष्ट केले आहे, काही जरी झाले तरी लोकसभा पटना साहिबवरूनच लढवणार. भाजपने त्यांच्या ऐवजी या लोकसभेच्या जागेवरून रविशंकर यांना उमेदवारी दिली आहे. 2009 मध्ये पहिल्यांना खासदार बनल्यानंतर शत्रुघ्न यांनी 5 वर्षांत 115 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती कमवली. 2014 चा लोकसभेचा अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती 132 कोटी असल्याचे जाहीर केले होते. जाणून घ्या सध्या किती आहे त्यांची संपत्ती.
घरातील गॅरेजमध्ये आजपण उभी आहे 1995 मध्ये घेतलेली अँबेसीडर
शत्रुघ्न यांच्या अॅफिडेविटनुसार, त्यांना कार खूप आवडतात. त्यांच्या कलेक्शनमध्ये 26 हजार रूपयांच्या अँबसीडरपासून पत्नी पुनम यांनी 2013 मध्ये खरेदी केलेली मर्सिडीज आहे. शत्रुघ्न यांच्याजवळ टोयोटा फॉर्च्यूनर, टोयोटा कॅमरी, इनोव्हा, महिंद्रा स्कॉर्पियो, होंडा अॅकॉर्ड आणि होंडा सिटी सारख्या कार आहेत. तर, ज्वेलरी बाळगण्याच्या बाबतीत शत्रुघ्न पत्नीपेक्षाही पुढे आहेत. त्यांच्याकडे 87 लाखांपेक्षा ज्वेलरी आहे, तर त्यांच्या पत्नीकडे अंदाजे 80 कोटींची ज्वेलरी आहे.
सोनाक्षीकडून घेतले आहे 10 कोटींची कर्ज
एडीआर रिपोर्टनुसार, शत्रुघ्न यांच्यावर अंदाजे 17 कोटींचे कर्ज आहे. यात एसबीआयकडून 1.15 कोटी आणि एलआयसीकडून 95 लाखांचे कर्ज घेतले आहे. त्याशिवाय त्यांनी मुलगी सोनाक्षीकडून 10 कोटी, मुलगा कुशकडून 56.75 लाख आणि दोन अन्य लोकांकडून काही रक्कम घेतली आहे.
राहतात 57 कोटींच्या बंगल्यात
शत्रुघ्न यांचे मुंबई, पुणे, दिल्ली, गुरुग्राम आणि पटनामध्ये 9 फ्लॅट आणि बंगले आहेत. मुंबईच्या जुहूमध्ये असलेल्या 'रामायण' या त्यांच्या बंगल्याची किंमत तब्बल 57 कोटी रूपये आहे. या बंगल्याला ते रेसिडेंशिअल आमि ऑफिस अशा दोन्हीसाठी वापरतात. शत्रुघ्न यांनी हा बंगला 1972 साली 10 कोटी रूपयांमध्ये खरेदी केला होता.
'ही माझी सगळ्यात मोठी चुक'
शत्रुघ्न 1992 मध्ये राजकारणात आले होते. राजेश खन्नाकडून पराभव मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणात येण ही सगळ्यात मोठी चुक असल्याचे बोलले होते. पण 2002 मध्ये परतत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राज्यसभेतून मंत्री बले. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि सलग 2009 आणि 2014 मध्ये विजयी झाले. 2014 नंतर मोदी सरकार आल्यापासून ते सतत मोदींच्या आणि भाजपच्या विरोधात बोलत आहेत, त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.