आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा भर रॅलीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना केले लाजिरवाणे, केले केवळ एक वक्तव्य आणि पसरली होती निरव शांतता 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शत्रुघ्न सिन्हा भाजपाचे नेता असूनही शनिवारी कलकत्त्यात झालेल्या विरुद्ध पक्षांच्या महारॅलीमध्ये सामील झाले. त्यांनी तेथे पीएमवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, जर ते राफेल मुद्यावर सफाई देणार नाहीत तर जाणत म्हणेल की, चौकीदारच चोर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, एकदा एका रॅलीदरम्यान शत्रुघ्न सिंह यांना लाजिरवाणे व्हावे लागले होते. त्यांना असे ज्यांच्यामुळे व्हावे लागले होते, ते म्हणजे माजी पंतप्रधान भारत रत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी.  

 

बिहारी बाबूला बिहारी भूमीवरच पाहायला मिळाले होते अटलजींचे हे रूप... 
- हि गोष्ट 27 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा वाजपेयीजी पटनाच्या गांधी मैदानात एका रॅलीला संबोधित करत होते आणि लोकही त्यांना खूप आदराने ऐकत होते. यादरम्यानच शत्रुघ्न सिन्हा मंचावर आले होते आणि त्यांना पाहून गर्दीने वाजपेयीजींना त्यांचे भाषण छोटे करण्याची डिमांड केली होती. जेणेंकरू लोकांना लवकरात लवकर आपला प्रिय नेत्याची स्पीच ऐकायला मिळावी. शत्रुघ्न हेही चेयरवरून उठले आणि जनतेचे अभिवादन स्वीकार करू लागले. लोकांनी शत्रुघ्न यांच्या फेवरमध्ये 'देश का नेता कैसा हो, बिहारी बाबू जैसा हो' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यामुळे वाजपेयीजी थोडे परेशान झाले. त्यांनी आपली  स्पीच मधेच थांबवली आणि सर्वांना शांत व्हायला सांगितले. पण जेव्हा शत्रुघ्न यांचे सपोर्टर्स घोषणा देतच राहिले तेव्हा मात्र वाजपेयीजींना राग आला. 

 

वाजपेयीजींनी एक स्टेटमेंट दिले आणि सगळीकडे निरव शांताता पसरली... 
- रागात वाजपेयीजी गर्दीला म्हणाले, "मला माहित आहे की, हा मंच बिहारी बाबूसाठी आहे. पण बिहारी बाबूलाही माहित आहे की, हा मंच अटल बिहारीसाठी आहे". यानंतर तिथे शांतता पसरली. अटलजींच्या या वनलाइनरने गर्दीची बोलतीच बंद केली. शत्रुघ्न सिन्हा यांनी अटलजींची माफी मागितली आणि आपल्या समर्थकांना शांत राहण्याची अपील केली. मग अटलजींनी शांतपणे आपले स्पीच पूर्ण केली. पण त्यांच्यासाठी हा अनुभव खूपच वाईट होता. कारण त्यावेळी शत्रुजी राजकारणात नवे होते. 

बातम्या आणखी आहेत...