आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच शरीराच्या उष्णतेमुळे भस्म झाले हे लोक, जाणून घ्या SHC म्हणजे नेमके काय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - कुणी तुम्हाला सांगत असेल की आपल्याच शरीरातील उष्णता आपल्याला जाळून राख करू शकते तर ते शक्य वाटेल का? या प्रश्नावर साहजिकच अनेकांना धक्का बसेल. गेल्या 300 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या तब्बल 200 घटना घडल्याची नोंद आहे. यात लोक बाहेरून नाही, तर आतून आग लागून भस्मसात झाल्याची उदाहरणे आहेत. अशा मृतदेहांवर संशोधकांनी कित्येकवेळा अभ्यास करण्याचा आणि नमूने गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतापर्यंत एकाही शरीरात आग लावणारे तत्व सापडलेले नाही. हे लोक आपल्याच शरीरातील गर्मीमुळे जळून भस्म झाले असा दावा केला जातो. वैज्ञानिकांनी या विचित्र प्रकाराला Spontaneous Human Combustion (SHC) असे नाव दिले आहे.


काय आहे SHC चे तथ्य?
- वैज्ञानिकांचा एक समूह हा सिद्धांत योग्य असल्याचा दावा करतो. तर, दुसऱ्या पक्षाने अशा प्रकारची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलप्रमाणे, Wick सिद्धांतानुसार मानवी शरीर एका मेणबत्तीसारखे काम करते. 
- सिद्धांतानुसार, कुठल्याही व्यक्तीला हल्कीशी आग लागल्यानंतर त्याच्या त्वचेचा जाळ होतो. शरीरातील उष्णतेमुळे आग लागल्यास त्याचा बॉडी फॅट कपड्यांवर चिटकतो. तेच बॉडी फॅट आगीला अधिक भडकावण्यासाठी इंधनाचे काम करते. मेण किंवा ग्रीसमुळे लागणारी आग अशीच असते. या अवस्थेत शरीराच्या वरचा भाग आगीत भस्मसात होतो. मात्र, पायांना काहीच होत नाही. 
- यातील आणखी एका पक्षाने अशा प्रकरणांना Paranaormal Activity (पारलौकिक शक्तींचे कृत्य) म्हटले आहे.


दुसरा पक्ष म्हणे, असे अशक्य आहे...
Spontaneous Human Combustion ला वैज्ञानिकांचा दुसरा पक्ष मानण्यास तयार नाही. मानवी शरीराला स्वतःला भस्मसात करण्यासाठी 700 ते 1000 डिग्री सेल्सिअस तापमान उत्पन्न करणे आवश्यक आहे. कुठलाही मानवी शरीर एवढे तापमान तयार करू शकत नाही. यासोबतच अशा प्रकारे आग लागून मरणाऱ्यांच्या शरीराभोवतालच्या सर्व वस्तू सुरक्षित दिसून आल्या आहेत. 1000 डिग्री सेल्सिअस तापमान उत्पन्न झाले, तर जवळपासची कुठलीही वस्तू सुरक्षित कशी काय राहू शकते? असा सवाल संशोधकांनी केला.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, या घटनांची उदाहरणे आणि आणखी काही तथ्य...

 

बातम्या आणखी आहेत...