आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षे शाेेधूनही पती नाही मिळाला, स्वत:शीच लग्न:अंगठी, गाऊन, केकवर केले 8 लाख खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - इटलीत राहणारी फिटनेस टीचर लाॅरा मेसी (४०) हिने २० वर्षांपर्यंत अापल्यासाठी ‘मिस्टर परफेक्ट’ पती शाेधण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरपर्यंत तिला जाेडीदार सापडलाच नाही. अखेर ४० व्या वाढदिवशी तिने स्वत:शीच लग्न उरकून टाकले. या लग्नाची सर्वत्र चर्चा हाेत अाहे. 
मेसीने या अनाेख्या लग्नसमारंभासाठी पांढरा शुभ्र गाऊन, केक अाणि अंगठी घेतला.

 

त्यासाठी तब्बल ८७०० पाउंड (सुमारे ८.१७ लाख) खर्च केले.  या लग्नात ७० नातलग सहभागी झाले हाेते. लाॅरा सांगते, ‘मी कुटुंबीयांना वचन दिले हाेते की, जर मला मनपसंत पती मिळाला नाही तर मी ४० व्या वाढदिवशी स्वत:शीच लग्न करीन. अाणि ते मी खरे करून दाखवले. अजूनही भविष्यात जर मला चांगला मुलगा मिळाला तर मी त्याच्याशी पुन्हा लग्न करीन. अाणि  त्यासाठी स्वत:शीच घटस्फाेटही घेईन.’

बातम्या आणखी आहेत...