आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांचे रक्त पाहून तिला व्हायची चरम शरीर सुखाची अनुभूती; अशाच 8 सर्वात कुख्यात Female सीरियल किलर्सची कहाणी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात असे सीरियल किलर होऊन गेले आहेत, ज्यांच्या कारनाम्याचा उल्लेख केला तरी अंगावर काटा येतो. क्रूरकर्मांना कितीही शिक्षा अपुरीच ठरते. सीरियल किल फक्त पुरुषच असतात असे नाही. अशा प्रकरणांमध्ये महिलांना सुद्धा पकडण्यात आले आहे. हे लोक मानसिक रुग्णासारखे असतात. यांची प्रत्येकवेळी खून करण्याची पद्धत एकसारखीच असते. जगभरातील सीरियल किलरच्या जबाबावरुन जाणवते की, त्यांना जिवंत माणसाच्या शरीरातून वाहणारे रक्त पाहून आनंद वाटतो. हा एक प्रकारचा अघोरी आनंद असतो. अशाच एका फीमेल सीरियल किलरला एखाद्या पुरुषाचा खून केल्यास तिला चरम शरीरसुखाची अनुभूती होत असे.


पुरुषांचे रक्त पाहून चरम शरीरसुखाची अनुभूती
एलेना लेबाचेवा, रशिया

रशियाच्या राजधनाती राहणारी एलिना 90 च्या दशकातील सर्वात कुख्यात सीरियल किलर होती. त्यावेळी आलेला हॉलिवूड चित्रपट ब्राइड ऑफ चकीची ती फॅन होती. त्यामध्ये एक बाहुली एकानंतर एक अनेकांचा खून करायची. एलेनाने त्या बाहुलीचा टॅटू सुद्धा बनवला होता. रशियातील सर्वात कुख्यात सीरियल किलर अॅलेक्झांडर पिचुस्किनला आदर्श मानत होती. तब्बल 49 महिलांची निर्घृण हत्या करणाऱ्या अॅलेक्झांडरला ती देवता मानत पूजा करत होती. सर्वात विचित्र म्हणजे, फक्त पुरुषांचाच खून करणारी एलेना हिला मर्दांचे रक्त पाहून चरम शरीरसुखाचा आनंद मिळत होता. पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिने हेच हत्या करण्याचे मूळ कारण होते असे सांगितले. 27 वर्षांच्या या महिलेला कोर्टाने 13 वर्षांची शिक्षा सुनावली.


पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच आणखी काही Female Serial Killers

बातम्या आणखी आहेत...