आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटेत काटे आल्याने “ती’ ची बस चुकली! ऐन चाचणीच्या वेळी नावे वगळली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संतोष काळे

औरंगाबाद - राज्य परिवहन महामंडळाच्या चालक विभागात महिलांना संधी देण्यासाठी अवजड वाहतूक परवाना देण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या. चालक होण्यास पात्र असतानाही ९ महिला मात्र अद्यापही हातात स्टेअरिंग येण्यापासून वंचित आहेत. चालक निवडीसाठी गेल्या ४ महिन्यांपासून हेलपाटे मारल्यानंतरही फक्त उडवाउडवीची उत्तरे ऐकावी लागत असल्याने या महिला त्रस्त झाल्या आहेत. न्याय मिळवण्याचे अंतिम पाऊल म्हणून या महिलांनी लवकरच आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे.
शासनाने गेल्यावर्षी चालक तथा वाहक पदासाठी ऑनलाईन सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, पुरुषांप्रमाणे महिलांनाही समान अटी-शर्ती होत्या परिणामी अशा अटींची पूर्तता करणे अशक्य असल्याने महिलांनी या भरतीकडे पाठ फिरवली. परिवहन मंडळाच्या स्थापनेपासून ते  २०१९ पर्यंत एकाही महिला चालकांची भरती झालेली नाही. चालक विभागात महिलांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी राज्य शासन आणि महिला चालकांसाठीच्या अटी शर्ती शिथिल केल्या. त्यामुळे अनेक महिलांचे चालक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पण या भरती प्रक्रियेसाठी अवजड वाहन परवाना, बॅच, अनुभव या सगळ्यांसाठी पात्र असतानाही औरंगाबाद बुलडाणा, अमरावती जळगाव येथील ९ महिलांनी त्यांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली.  आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये एकूण एकूण ९ महिला बस चालक तथा वाहक कनिष्ठ या पदासाठी अर्ज केला होता. नियमानुसार लेखी परीक्षा उत्तीर्ण केली व कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलो आहोत. महामंडळाने आमची नावे संगणकीय वाहन चालवण्याच्या चालविण्याची चाचणी भोसरी येथे ठेवली होती. आमच्याकडे अवजड वाहन परवाना व प्रवासी वाहन परवाना व नियमानुसार अनुभव दिला आहे. परंतु महामंडळाने नवीन परिपत्रक काढून  हलके वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या महिलांना एक वर्षाचे प्रशिक्षण देऊन मंडळाच्या नियमानुसार वाहनचालक पदावर सामावून घेतले जाईल, असे सांगितले आहे. या महिलांप्रमाणेच आम्हालाही वाहन चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले तर आम्ही देखील भोसरीची ड्रायव्हिंग टेस्ट पास होऊ शकतो. ऐन चाचणीच्या वेळी नावे वगळली : वनिता मोरे

या सरळसेवा भरती प्रक्रियेला प्रक्रियेच्या बळी ठरलेल्या औरंगाबादच्या वनिता मोरे दिव्य मराठीकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, २०१७ च्या  भरतीच्या वेळी चालक पदासाठी अर्ज केला. त्यावेळी बस बॅच व अनुभव नव्हता३ तसेच १५० ते १८० सेंटीमीटर उंचीची अट असल्याने यामध्ये अपात्र ठरले.  त्यानंतर नियम शिथिल झाले. चालक पदासाठी मुलींना एक वर्ष प्रशिक्षण दिल्यानंतर चाचणी घेण्यात येईल, असे जाहिरातीत नमूद केले होते. वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली. पण ऐन चाचणीच्या वेळी मात्र आमची नावे वगळण्यात आली.
 

बातम्या आणखी आहेत...