आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला संशोधकाने विदूषक होऊन कर्करोग पीडितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली - दिल्लीच्या शीतल अग्रवाल यांनी संशोधकाची नोकरी सोडून कर्कराेग पीडित बालकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवण्याचा वसा घेतला आहे. त्या विदूषकाच्या वेशभूषेत मुलांसमोर येतात. तेव्हा कोमेजलेले बालमन तरारून येते आणि काही क्षणांत खळाळून हसू लागते. त्याच्या चेहऱ्यावरील तणाव पार दूर पळून जातो. ही किमया शीतल व यांची टीम सहज साधते. रुग्णांना आनंदी ठेवण्याच्या या पद्धतीला मेडिकल क्लाउनिंग असे म्हटले जाते.  


शीतल २०१६ पासून कर्करोग पीडित मुलांसाठी मेडिकल क्लाउनिंगचे काम करत आहेत. त्यांनी ही संकल्पना त्याच वर्षी ऐकली होती. तेव्हापासून त्या मुलांसाठी काहीतरी करण्याच्या विचाराने झपाटल्या होत्या. तेव्हा दिल्लीत मेडिकल क्लाउनिंगबद्दल फार कमी लोकांनी माहिती होती. हे काम करण्यासाठी उत्सुक शीतल यांनी सर्वात आधी आरोग्य विभागाला पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली. त्यानंतर शीतल यांना विभागाकडून चर्चेसाठी बोलावणे आले. शीतल सर्व तयारीनिशी पोहोचल्या होत्या. त्यांची तयारी पाहून सरकारने त्यांना चाचा नेहरू बाल रुग्णालयात प्रयोग करण्याची परवानगी दिली. त्यासाठी विदूषकांची टीम हवी, अशी अट होती. शीतल यांनी लोकांशी चर्चा केली. अखेर पाच जणांची टीम तयार झाली. रुग्णालयातील लोकांना त्यांचे काम चांगले वाटले. शीतल यांनी दोन वर्षात क्लाउनसेलर्स नावाचा ग्रूप तयार केला. हा ग्रुप आता केवळ रुग्णालयातच नव्हे शाळा, वृद्धाश्रमातही सर्वांना खळखळून हसवतो. 


िवनोद, संगीत, जादूचे प्रयोग करून हास्य  वसुली केली जाते
मेडिकल क्लाउनिंग रुग्णांची देखभाल करण्याची ही अनोखी पद्धत आहे. हे काम करणाऱ्यांना क्लोनडॉक्टर असे संबोधले जाते. कर्करोगासारख्या आजारात रुग्णांमध्ये सकारात्मकता वाढावी यासाठी क्लोन डॉक्टर हे हास्य फुलवतात. त्यासाठी विनोद, जादू,संगीत व कथा कथन करूनही ते रुग्णांना हसवण्याचा प्रयत्न करतात. 


अमेरिका, ब्रिटनसह ३० देशांमध्ये मेडिकल क्लाउनिंग होते
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन, कॅनडा, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँगसह सुमारे ३० देशांतील रुग्णालयांत मेडिकल क्लाउनिंग केली जाते. अमेरिकेत पॅच अॅडम्स (७८) यांना जगातील पहिले क्लोन डॉक्टर म्हणून आेळखले जाते. अॅडम्स यांनी १९७० मध्ये मेडिकल क्लाउनिंग सुरू केली होती. १९८६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ती व्यावसायिक स्वरुपात सुरू झाली. 

बातम्या आणखी आहेत...