आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगाव पालिकेच्या मुख्याधिकार्‍यासह रोखपालास 1 लाख 20 हजारांची लाच घेताना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव- निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच घेतांना शेगाव नगर पालिका मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी 9 वाजता केली. या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी दस्ताऐवज पालिकेत सादर करण्यात आले. दरम्यान, या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी रोखपालाच्या मध्यस्थीने केली. सदर प्रकरणी संबधितांनी यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाच मगितल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी विभागून एकाचवेळी शेगाव पालिकेचे अतुल पंत व मुख्याधिकारी रोखपाल आर. पी. इंगळे या दोघांच्या घरी धाड टाकली. दरम्यानच्या काळात रोखपाल आणि मुख्याधिकाऱ्यांचे संभाषण झाले.

 

मुख्याधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रोखपाल आर.पी. इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने मुख्याधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी सुरूवातीला पाच लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, शेवटी 1 लाख 20 हजार रुपयांवर तडजोड ठरली होती. याप्रकरणी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे यांची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक करीत आहे. सदर घटनेची बातमी समाज माध्यमांद्वारे वायुवेगाने परिसरात पोहोचली. यामुळे शेगाव पालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...