आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेख हसीना यांनी प्रियंका गांधींची गळाभेट घेतली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष साेनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाने रविवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेश उच्चायुक्त कार्यालयात भेट घेतली. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग व आनंद शर्मा यांचीही उपस्थिती हाेती.

प्रियंका गांधी-वढेरा यांनी हसीना यांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठकीत दाेन्ही देशांच्या संबंधाला बळकट करण्यावर चर्चा करण्यात आली. हसीना चार दिवसांच्या भारताच्या दाैऱ्यावर आल्या हाेत्या. त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सात करारांवर स्वाक्षरी केली हाेती.

हसीना बांगलादेशच्या सर्वात दीर्घकाळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्या नेत्या बनल्या आहेत. २००९ मध्ये त्या दुसऱ्यांदा सत्तेवर आल्या हाेत्या. तेव्हा भारतात यूपीए-२ सरकार हाेते. तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग २०११ मध्ये बांगलादेशच्या दाैऱ्यावर गेले हाेते. भारत व बांगलादेशचे संबंध सुरूवातीपासून चांगले असून नवीन सरकारनेही योग्य वाटचाल सुरू ठेवली आहे.