आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shekhar Kapoor Says 'I Still Feel Like Being A Refugee In India', Javed Akhtar Get Angry And Fired Him On Twitter

शेखर कपूर म्हणाले 'भारतात अजूनही मला रेफ्युजी असल्यासारखे वाटते', तर भडकले जावेद अख्तर, ट्विटरवर सुनावले खडे बोल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपसह 49 प्रतिष्ठित व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. पात्रात लिहिले गेले होते, ''दुःखद बाब आहे की, 'जय श्री राम' आज एक भडकवणारे युद्ध बनले आहे. भारतातील बहुसंख्यक समुदायांमध्ये रामाचे नाव पवित्र आहे.' या पत्रानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एकीकडे अशा भोसले यांचे मजेशीर विधान तर काही ठिकाणी यामुळे गंभीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. 

 

शेखर कपूर यांचे वादग्रस्त वक्तव्य... 
यातीलच एक नवे उदाहरण म्हणजे डायरेक्टर शेखर कपूर यांचे ट्वीट. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना आजही भारतात रेफ्यूजीसारखे वाटते. त्यांनी लिहिले, 'फाळणीतील रेफ्युजी म्हणून आयुष्य सुरु केले. पालकांनी मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी सर्वकाही केले. नेहमीच 'बुद्धिजीवी'च्या भीतीमध्ये जगत आलो आहे. त्यांनी नेहमीच मला तुच्छ असल्याची जाणीव करून दिली. नंतर अचानक त्यांनी माझ्या चित्रपटांमुळे आलिंगन दिले. मला अजूनही त्यांची भीती वाटते. त्यांचे आलिंगन सापाच्या दंशासारखे असते. अजूनही मी एक रेफ्यूजी आहे.'

 

 

भडकले जावेद अख्तर... 
शेखर कपूरचे ट्वीट पाहून जावेद अख्तर भडकले. त्यांनी शेखरला एकानंतर एक ट्विट करून खूप खरे खोटे ऐकवले. जावेद अख्तर यांनी लिहिले, 'अजूनही रेफ्यूजी असण्याचा तुमचा काय अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे का की, तुम्ही स्वतःला अजूनही भारतीय नाही तर बाहेरचा समजता आणि तुम्हाला असे वाटते की, ही तुमची मातृभूमी नाही. जर तुम्हाला भारतातदेखील रेफ्यूजी असल्यासारखे वाटत असेल तर कुठे तुम्ही स्वतःला रेफ्यूजी समजणार नाही, पाकिस्तानमध्ये ? बिचारे श्रीमंत पण एकटे व्यक्ती, बंद करा हा ड्रामा.' 

 

 

जावेद अख्तर यांनी आणखी एक ट्वीट केले ज्यामध्ये त्यांनी लिहिले, 'कोण आहेत हे बुद्धिजीवी ज्यांनी तुम्हाला आलिंगन दिले आणि तुम्हाला ते सर्पाच्या दंशासारखे वाटले ? श्याम बेनेगल, अदूर गोपाल कृष्णा, राम चंद्र गुहा? वास्तवात ? शेखर साहेब तुम्ही ठीक दिसत नाहीत आहात. तुम्हाला मदतीची गरज आहे. मेनी करा, एखाद्या चांगल्या सायकायट्रिस्टकडे जाण्यात काहीच लाजिरवाणे नाही.'