आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे होतात दुप्पट, 50 हजार जमा केल्यास 1 लाख रूपये मिळणार; मुलांच्या नावावर करू शकता गुंतवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूज डेस्क - पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमधून ग्राहकांना चांगला परतावा मिळत आहे. शेतकरी विका पत्र ही देखील त्यातीलच एक स्किम आहे. यामध्ये सध्या 7.7 टक्के व्याज देण्यात येत आहे. तुम्ही यामध्ये फक्त 1 रूपयाची गुंतवणूक करू शकता. ही योजना एकप्रकारचे पत्र आहे. याला कोणीही खरेदी करू शकतो. याला बाँडप्रमाणे पत्राच्या स्वरूपात जारी करण्यात आले आहे. यावरील व्याजही दरवेळी बदलत असते. तुम्ही यामध्ये 50 हजार रूपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 1 लाख रूपये परतावा मिळेल. तुम्ही स्वतःसोबत मुलांच्या नावावर देखील खरेदी करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला या पत्राविषयी सांगत आहोत. 

 

एक हजार पटीने जमा करावे लागतील पैसे
या योजनेत 1 हजार रुपयांच्या पटीने पैसे जमा करावे लागतात. 1 हजार, 2 हजार, 3 हजार अशाप्रकारे तुम्हाला यामध्ये जमा करावे लागतील. तुम्हाल सर्व पैसा एकदाच द्यावा लागतो. म्हणजे यामध्ये इतर योजनांप्रमाणे दर महिन्याला पैसे भरण्याची सुविधा नाहीये. उदा. तुम्हाला एका लाखाचे दोन लाख करायचे असतील तर यासाठी तुम्हाला पूर्ण 1 लाख रुपये यामध्ये गुंतवावे लागतील. 9 वर्ष 10 महिन्यांनतर ते 2 लाख रूपये होतील. या अकाउंटसाठी पोस्ट ऑफिसकडून पासबुकही देण्यात येते. 

 

मॅचोरिटीपूर्वी काढता येतात पैसे

> शेतकरी विकास पत्र योजनेत तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत तुमजा फंड मॅचोरिटीपूर्वी परत घेऊ शकतात. पण यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याची अट आहे. 

> मॅचोरिटीपूर्वी पैसे काढल्यानंतर त्यावरील निश्चित केलेले व्याज 2 टक्के कमी संपूर्ण रक्कम परत मिळते. 

 

'शेतकरी विकास पत्रा'चे फायदे

> या योजनेत 7.7 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर बँक किंवा एफडी पेक्षा जास्त आहे. 
> किमान 1 हजार रूपयांपासून या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच गुंतवणूक करण्याठी कोणतीही कमाल रक्कम निश्चित नाही. 
> ही पोस्ट ऑफिसची योजना असल्यामुळे पैसे बुडण्याची भिती नाहीये. 
> ही योजना सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सुरु असून तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...