Home | Maharashtra | Vidarva | Akola | Shevantabai Sarkate Memorial Award

'हरवल्या आवाजाची फिर्याद'ला शेवंताबाई सरकाटे स्मृती पुरस्कार

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:20 AM IST

भुसावळच्या मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृती प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय शेवंताबाई सरकाटे स्मृती काव्य पुरस्कार मंगळवारी

  • Shevantabai Sarkate Memorial Award

    अकोला- भुसावळच्या मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृती प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय शेवंताबाई सरकाटे स्मृती काव्य पुरस्कार मंगळवारी जाहीर केले. प्रथम पुरस्कार साक्रीचे रावसाहेब कुंवर यांच्या 'हरवल्या आवाजाची फिर्याद'ला तर द्वितीय पुरस्कार प्रभाकर शेळकेंच्या 'जाती अंताचे हुंकार', नागपूरचे डॉ. चोरमारेंच्या 'धर्मशास्त्राच्या अमानुष नोंदी' याला विभागून देण्यात येईल. तृतीय पुरस्कार चांदूर रेल्वेच्या कवयित्री निर्मला सोनी यांच्या 'तू गुंतला असा की' व सचिन कांबळेंच्या 'भावनांचा कल्लोळ'ला विभागून देण्यात येईल. उत्तेजनार्थ पुरस्कार यशवंत माळी यांच्या 'सखी', जयराज खूने यांच्या 'मी माझ्या भूमीच्या शोधात' व पंडित कांबळेंच्या 'चरथ भिखखवे' यांच्या काव्यसंग्रहांना विभागून देणार आहे. राज्य काव्य पुरस्कारासाठी काव्यसंग्रह मागवले होते. तज्ज्ञ समितीने त्याचे परीक्षण केले. त्यानंतर निकाल जाहीर केला. साहित्य चळवळ प्रवाहीत राहावी, या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सरकाटे यांनी दिली.


    राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
    मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृती प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी दिलीप ब्राम्हणे यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा ८ सप्टेंबरला नांदुरा येथे स्व. हरिभाऊ इंगळे स्मृती सभागृह, सप्तशृंगी टॉवर रेल्वेस्टेशनजवळ होईल. 'बारोमासकार' सदानंद देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. प्राचार्य डॉ. सिद्धार्थ मेश्राम अध्यक्षस्थानी राहतील, अशी माहिती देण्यात आली.

Trending