Home | National | Other State | shia waqf board Chairmen waseem rizvi support Ram Mandir In ayodhya Wants To gift hindu community

'बाबरी म्हणजे हिंदुस्तानी जमिनीवर कलंक, जागा हिंदूंना परत करावी' - वसीम रिझवींचा व्हिडिओ व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 05:30 PM IST

मंदिरे तोडून बांधली होती बाबरी, हे इस्लामिक सिद्धांतांच्या विरुद्ध- वसीम रिझवी

 • shia waqf board Chairmen waseem rizvi support Ram Mandir In ayodhya Wants To gift hindu community

  लखनऊ (यूपी) - राम मंदिरावरून देशभरात वातावरण तापलेले आहे. यादरम्यान शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात त्यांनी बाबरी मशिदीबद्दल चकित करणारे वक्तव्य केले आहे. रिझवींचा हा व्हिडिओ सर्वप्रथम ऑक्टोबरमध्ये आला होता. तेव्हाही देशभरात यावरून चर्चा सुरू झाली होती. आता हाच व्हिडिओ विविध सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. वसीम रिझवींनी मुस्लिमांना समेट करून हा परिसर हिंदूंना सोपवण्याचे समर्थन यात केले आहे.

  व्हिडिओत बाबरीला कलंक म्हणताहेत वसीम रिझवी...

  वसीम रिझवी म्हणाले की, त्या कलंकाला मशीद म्हणणे म्हणजे मोठा गुन्हा आहे, कारण मशिदीच्या खालचे खोदकाम 137 मजुरांनी केले होते, यात 52 मुस्लिम होते. त्या खोदकामादरम्यान 50 मंदिरांच्या स्तंभांखाली विटांचा चबुतरा आढळला होता.

  त्यांनी दावा केला की, खोदकामादरम्यान मंदिराशी संबंधित एकूण 265 जुने अवशेष आढळले होते. याच आधारावर भारतीय पुरातत्त्व विभाग (एएसआय) निष्कर्षावर आले की, जमिनीवर बांधलेल्या बाबरी मशिदीखाली एक मंदिर दबलेले आहे. थेट बोलायचे झाल्यास बाबरी मशीद या मंदिरांना तोडून त्याच्या ढिगाऱ्यावर बांधण्यात आली आहे.

  बाबरी मशीद तोडलेल्या मंदिरांच्या ढिगाऱ्यावर उभी असल्याचे प्रमाण त्यानी के. के. मोहम्मद यांचे पुस्तक 'मैं भारतीय हूं'मध्येही करण्यात आल्याचा दाखला त्यांनी दिला. अशा स्थितीत त्या बाबरी कलंकाला मशीद म्हणणे म्हणजे इस्लामिक सिद्धांतांच्या विरुद्ध आहे.

  अजूनही वेळी गेली नाही, अशा सर्व मशिदी हिंदूंना सोपवा, ज्या मंदिरे तोडून बांधल्या...

  यापूर्वी रिझवी म्हणाले होते की, अजूनही वेळ गेली नाही, लोकांनी बाबरी मशिदीशी जोडावे, आपल्या गुन्ह्यांबद्दल तौबा करावी आणि हजरत मोहम्मद यांचा इस्लाम मानावा. दहशतवादी अबु बक्र, उमर यांची विचारधारा सोडून एक समेटाची बैठक घ्यावी. रामाचा हक्क हिंदूंना परत करावा आणि एक नवीन शांततेची मशीद लखनऊत वैध पैशांनी बांधण्याचा पुढाकार घ्यावा.

  यापूर्वी शिया सेंट्रल बोर्डाचे चेयरमन वसीम रिझवींनी पूजा स्‍थळ (विशेष तरतूद) अधिनियम-1991 ला संपवण्याची मागणी केलेली आहे. रिझवींची मते, पूजा स्‍थळ (विशेष प्रावधान) अधिनियमांतर्गत वादग्रस्त मशीद सुरक्षित करण्यात आलेली आहे. ती हिंदंना सोपवण्यास अडचण येईल. यामुळे हा अधिनियम संपुष्टात आणावा.

  रिझवींनी हा कायदा संपवण्यासोबतच मुघल काळात मंदिरांना तोडून बांधण्यात आलेल्या 9 मशिदी यात अयोध्या, काशी, मथुरा, कुतुब मीनार इत्यादी 9 ठिकाणे आहेत, त्यांना हिंदूंना परत करण्याची मागणी केलेली आहे.

  त्यांची आणखी एक मागणी आहे की, एक स्पेशल कमिटी बनवून कोर्टाच्या निगराणीत वादग्रस्त मशिदींच्या बाबतीत परिपूर्ण माहिती दिली जावी. जर हे सिद्ध झाले की, त्या हिंदूंची धर्मस्थळे तोडून बांधण्यात आल्या आहेत, तर त्या हिंदूंना परत केल्या जाव्यात.

  बाबरीच्या जागेवर फक्त राम मंदिरच बांधावे...

  रिझवी हेही म्हणाले की, अयोध्येत त्या जागेवर कधीच मशीद नव्हती. आणि तेथे मशीद कधीच असू शकत नाही. हे भगवान रामाचे जन्मस्थान आहे. येथे फक्त राम मंदिरच बांधले जावे. बाबरशी सहानुभूती असणाऱ्यांच्या नशिबी पराजयच आहे.

Trending