आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shikara Lead Actors Were Given Eight Hours Of Training Daily For Two Whole Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘शिकारा’साठी आदिल-सादियाने दोन वर्षे दररोज घेतले 8 तासांचे प्रशिक्षण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधू विनोद चोप्रा हे दिग्दर्शक म्हणून ‘शिकारा’द्वारे दीर्घ काळानंतर पुनरागमन करत आहेत. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. यात त्यांनी पलायनाचा फटका बसलेल्या कलावंतांची निवड केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाद्वारे दोन नवीन चेहरे आदिल खान आणि सादिया पदार्पण करत आहेत. त्यांना अभिनेता म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी दोन वर्षे दररोज ८-८ तासांचे प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून काश्मिरची वास्तवता स्पष्टपणे मांडता येईल.

चित्रपटातून दाखवणार वास्तव
चित्रपटात नवोदित कलावंतांनी काम केले आहे. त्यात आदिल खान व सादिया आहेत. त्यांच्याच यात प्रमुख भूमिका आहेत. कारण चित्रपटात वास्तव दाखवण्यासाठीच त्यांची निवड करण्यात आली आहे. एखाद्या चित्रपटासाठी यापूर्वीही अनोळखी नवोदित कलावंतांना घेण्यात आलेले आहे, जेणेकरून वास्तव स्पष्टपणे दाखवता येईल. त्या दोन्ही कलावंतांना सलग दोन वर्षे दररोज आठ-आठ तासांचे प्रशिक्षण दिले गेले.’

निर्मितीला लागली २५ वर्षे
या चित्रपटाची निर्मिती करणे सोपे नव्हते. याचा स्क्रीनप्ले लिहिणाऱ्या टीममधील अभिजात जोशीने सांगितले, ‘विधूजी गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन करत होते. मात्र, राहुल पंडित यांचे पुस्तक हाती लागल्यानंतरच आम्हाला अनेक पैलू दिसून आले. त्यांचे पुस्तक ‘अवर मून हॅज ब्लड क्लॉट्स’ वाचल्यानंतरच यावर चित्रपट बनवण्याची आमच्यात हिंमत आली. काश्मिरच्या अशा लोकेशन्सवर याची शूटिंग करण्यात आली, जिथे यापूर्वी कधी शूटिंग झालेली नव्हती. याच्या निर्मितीला २५ वर्षे लागली.