आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिखर धवन गुडघ्याच्या दुखापतीमुळे विंडीज मालिकेतून बाहेर, सॅमसनचा संघात समावेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय सलामीवीर शिखर धवन गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला. तीन सामन्यांच्या मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. सॅमसन बांगलादेश विरुद्ध टी-२० मालिकेत टीममध्ये होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. धवनला घरच्या टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गेल्या आठवड्यात महाराष्ट्र व दिल्लीच्या सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. बीसीसीआयने म्हटले की, 'धवनच्या पायाला टाके पडले. त्याच्या दुखापतीला बरे होण्यास वेळ लागेल.' धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येतील.

बातम्या आणखी आहेत...