आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shikhar Dhawan Played First Class After 15 Months; Delhi Scored 269 Runs For The Loss Of Six Wickets

धवन 15 महिन्यांनंतर प्रथम श्रेणीत खेळला; शतक ठोकले, दिल्ली संघाच्या 6 बाद 269 धावा

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सलामीवीर शिखर धवनने १५ महिन्यांनंतर प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये हैदराबाद विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीकडून खेळताना धवनने शतक झळकावले. पहिल्या दिवस अखेर धवन १९८ चेंडूंत १३७ धावांवर नाबाद आहे. त्याने ७० च्या स्ट्राइक रेटने खेळत १९ चौकार व २ षटकार खेचले. दिल्लीने पहिल्या दिवशी ६ बाद २६९ धावा काढल्या. फिरोजशाह कोटलावर सुरू असलेल्या सामन्यात कुणाल चंदेला (१) व ध्रुव शौरी (०) आल्या पावली परतले. नितीश राणाने २५ धावा केल्या. कुंवर बिधुरी नाबाद २२ धावांवर खेळत आहे.

महाराष्ट्राच्या ऋतुराजचे शतक


महाराष्ट्राने छत्तीसगड विरुद्ध ७८ षटकांत ६ बाद २३८ धावा काढल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकले. त्याने १९९ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकार खेचत १०८ धावा केल्या. केदार जाधव १२ व अंकित बावणे २० धावांवर परतले. विशांत मोरे नाबाद ४९ व सत्यजित बच्छाव नाबाद १२ धावांवर खेळताय. व्ही. प्रताप सिंगने ५६ धावा देत ४ गडी बाद केले.

अशोक डिंडावर बंदी

बंगाल टीम बुधवारी आंध्र प्रदेश विरुद्ध मैदानात उतरली. त्यापूर्वी बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडावर शिस्त भंगामुळे बंदी घातली. डिंडाने संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासोबत गैरवर्तन केले. ज्यामुळे त्याच्यावर कार्यवाही केली. सामन्यात बंगालने प्रथम खेळताना ४ बाद २४१ धावा काढल्या. सलामीवीर अभिषेक रमणने शतक झळकावले. तो ११० धावांवर नाबाद राहिला आहे.