आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shilpa Shetty 25 Lakh Gold Crown To Shirdi Sai Baba: Shilpa Donate 10 Lacks To HIV Infected Children Orphanage And Renovate Their Shelter In 50 Lacks

शिल्पा शेट्टीने साई बाबांना अर्पण केला 25 लाखांचा सोन्याचा हा, नुकतीच HIV पीडित मुलांनाही दिली मोठी रक्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. शिल्पा शेट्टी गुरुवारी संध्याकाळी उशीरा आई सुनंदा शेट्टी, पती राज कुंद्रा, मुलगा विवान आणि बहीण शमिता शेट्टीसोबत साई बाबाच्या दर्शनासाठी शिर्डीला पोहोचली होती. बाबांच्या समाधीला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शिल्पा शिर्डीला गेली होती. विशेष म्हणजे शिल्पाने साई बाबांना 800 ग्रामचा मुकुट अर्पण केला. याची किंमत 25 लाख आहे. शिल्पाने सोशल मीडियावर हे फोटोज शेअर करत लिहिले की, "थँक्यू माझे साई, मला विश्वास आणि धैर्याचे सार समजावण्यासाठी... माझे कुटूंब आणि माझे नेहमी संरक्षण करण्यासाठी... आज गुरुवार आहे, मी माझ्या चाहत्यांना डायरेक्ट साई बाबांचे दर्शन देत आहे. " शिल्पा शेट्टी साई बाबांना खुप मानते. ती नेहमीच कुटूंबासोबत दर्शनासाठी जाते. यापुर्वी ती ऑगस्ट 2017 मध्ये मुलगा विवान आणि आई सुनंदासोबत साईंच्या दर्शनासाठी पोहोचली होती. पण ती फक्त मंदीरात नाही तर अनेक ठिकाणी दान करत असते. यासोबतच ती चॅरिटीसाठीही काम करत राहते. 


अनाथाश्रमात केले 10 लाखांचे दान 
- शिल्पा शेट्टीने 2007 मध्ये रियलिटी शो 'बिग ब्रदर'(2007) जिंकल्यानंतर प्रसिध्द झाली होती. या शोमध्ये तिने 85 लाखांची रक्कम जिंकली होती. यामधील मोठा भाग तिने इडियन  AIDS अवेयरनेस कँपेनला डोनेट केला होता.
- शिल्पाने नुकतेच 10 लाख रु. बेलगाम (कर्नाटक) येथील एका अनाथाश्रमात दिले. ही रक्कम शिल्पाने 'दस का दम-3' शोमध्ये जिंकली होती. ही तिने अनाथाश्रमात डोनेट केली होती. यामध्ये 60 HIV ग्रस्त मुलं राहतात.
- यासोबतच शिल्पा आणि तिचे पती राज या अनाथाश्रमामध्ये मुलांसाठी खाण्याच्या आणि गरजेच्या वस्तू पोहोचवतात. दोघांनी काही काळापुर्वी त्यांच्या राहण्याची जागा पुर्णपणे रिनोवेट केली होती. यावर 40 ते 50 लाख रुपये खर्च केले होते.
- शिल्पाचे  Shilpa Shetty Foundation नावाचे एक NGO आहे. या माध्यमातून गरीब आणि निराधार लोकांची मदत केली जाते. यासाठी शिल्पा नेहमीच गरजवंतांना मदत करत असते.
- शिल्पा शेट्टी दिर्घकाळापासून अॅनिमलरायट्स ग्रुप पेटाला जोडली गेली आहे. ती यासाठी नेहमीच दान करत असते.

 

शिल्पाने घेतला आहे नेत्रदानाचा निर्णय 
- शिल्पाने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 मध्ये शिल्पा पती राज आणि वडील सुरेंद्र शेट्टी यांच्यासोबत महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सोनाई गावातील शनि शिंगणापुर मंदिरात दर्शनासाठी आली होती. 
- या दरम्यान तिने सामाजिक संस्था यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. शिल्पाने यासाठी औपचारिक पध्दतीने एक फॉर्म भरला होता. 
- शिल्पा म्हणाली होती की, "मृत्यूनंतर माझे डोळे कामाचे राहणार नाही. माझे डोळे दुस-या कुणाला प्रकाश देत असतील तर मला समाधान मिळेल."
- शिल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टीनेही याच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. 

बातम्या आणखी आहेत...