आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टी आणि तिच्या नव-यावर फसवणूक केल्याचा आरोप, राज कुंद्रा यांनी फेटाळून लावले सर्व आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिन जोशी नावाच्या एनआरआयने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचा आरोप आहे की, त्याने गोल्ड ट्रेडिंग करणा-या एका कंपनीत गुंतवणूक केली होती जी आता बंद झाली. गुंतवणूकीच्या वेळी शिल्पा शेट्टी आणि तिचे पती या कंपनीत महत्त्वाच्या पदांवर नियुक्त होते.

जोशी यांच्या म्हणण्यानुसार मार्च 2014 मध्ये त्यांनी सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून  18.58 लाख रुपयांत एक किलो सोने खरेदी केले. त्यावेळी पंचवार्षिक योजनेंतर्गत त्यांना सूट दराने सोन्याचे कार्ड देण्यात आले होते आणि निश्चित मुदत संपल्यानंतर त्यांना त्या मोबदल्यात सोने मिळवून देण्याचे वचन दिले होते.

पाच वर्षानंतर कंपनी बंद 

मार्च 2019 मध्ये जोशींनी पाच वर्षे पूर्ण करून त्या कार्डवर सोने मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना समजले की, वांद्रे-कुर्ला स्थित ही कंपनी बंद पडली आहे, तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मे 2016 आणि नोव्हेंबर 2017 मध्ये संबंधित पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जोशी यांनी या जोडप्यासह आणखी काही लोकांविरूद्ध खार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांकडे पोहोचले सचिन जोशी 


फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर जोशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही आणि सध्या तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

राज यांनी हे आरोप फेटाळून लावले

या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत अधिकृत निवेदन दिले आहे.  एनआरआय व्यक्तीला झालेल्या नुकसानीसंदर्भात मला किंवा शिल्पाला कोणतीही तक्रार मिळालेली नाही असे त्यांनी सांगितले. ज्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, त्यांच्यासाठी कंपनी वेबसाइटवर सर्व संबंधित तपशील आणि संपर्काशी निगडीत माहिती दिली आहे. वस्तुस्थितीची तपासणी केल्यावरच माहिती प्रसिद्ध करावी अशी मी माध्यमांना विनंती करीन.