आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : डान्स रियलिटी शो 'सुपर डान्सर' च्या सेटवर शोचे जज शिल्पा शेट्टी,गीता कपूर आणि अनुराग बसु 'ट्रुथ एंड डेयर' खेळताना दिसले. पण यातही एक ट्विस्ट होता. जज एक फन गेम खेळात होते, ज्यात त्यांना येणाऱ्या स्पर्धकांविषयी सांगायचे होते की, तो मुलगा आहे कि मुलगी. ज्याही जजचे अनुमान चुकले त्याला ट्रूथ एंड डेयरपैकी एक काहीतरी निवडायचे होते. या गेममध्ये शिल्पा शेट्टी हारली आणि मग अनुरागने तिला एक डेयर दिले. या डेयर मध्ये शिल्पाला पती राज कुंद्राला फोन करून त्याच्याशी भांडण करायचे होते.
जेव्हा पतीकडून हरली शिल्पा शेट्टी...
राज कुंद्राला कॉल करताना शिल्पाने सांगितले की, माझ्या फोनच्या स्पीड डायलमध्ये माझी मेड, मैनेजर आणि मुलाचा नंबर आहे, राज कुंद्राचा नाही. यानंतर शिल्पाने फोनवर राजशी भांडण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली. सेटवरील सूत्रांकडून कळले की, 'राज कुंद्राने गंमतीत एकदा म्हणाले होते की, जेव्हा एखादी मुलगी त्याच्या आसपास असते तेव्हाच नेमके शिल्पा त्याला बोलावून घेते. शिल्पाने त्यांच्याशी भांडण्याचा प्रयत्न केला आणि विचारले कि काल रात्री ती कुठे होता. पण जेव्हा राजने उत्तर दिले की, तो शिल्पाच्या आईसोबत फिल्म पाहायला गेला होता. तेव्हा शिल्पाची बोलती बंद झाली आणि ती पुढे भांडूचा शकली नाही. अशा पद्धतीने शिल्पा पतीकडून डेयर चॅलेंज हारली.
यामुळे राज कुंद्राला हृदय दिले शिल्पाने...
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. लंडनमध्ये जिथे शिल्पा रियलिटी शो 'बिग ब्रदर' (2007) जिंकल्यानंतर पॉपुलर झाली तिथे राजही बिजनेसच्या जगात चांगलेलंच फेमस होते. दोघांची भेट शिल्पाचा परफ्यूम ब्रांड S2 च्या प्रमोशनदरम्यान झाली. राजने शिल्पाचा परफ्यूम ब्रांड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. शिल्पाला राजचे फ्रेंडली नेचर खूप आवडले आणि तेव्हापासूनच ती त्याला मनातल्या मनात साठवू लागली. हळू हळू दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली. काही दिवस डेटिंग केल्यानंतर 2009 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर आता शिल्पा जिथे कुठे जाते तिथे तिच्या पतीच्या श्रीमंतीची चर्चा होते. शिल्पाचे पती राज कुंद्रा लंडनचे मोठे बिजनेसमॅन आहेत. राज कुंद्राने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शिल्पासोबत लग्न केले. मात्र राजच्या पहिल्या पत्नीने आरोप केला होता की, शिल्पाने राज कुंद्रासोबत पैशांसाठी लग्न केले.
शिल्पाला गिफ्ट केले होते 50 कोटींचे अपार्टमेंट...
राज कुंद्राने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला शिल्पाला दुबईमध्ये बुर्ज खलीफाच्या 19 व्या फ्लोरवर एक अपार्टमेंट गिफ्ट केले होते. रिपोर्ट्सनुसार या अपार्टमेंटची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे. एवढेच नाही राजने इंग्लंडमध्येही शिल्पाला एक बंगला गिफ्ट केला आहे. या बंगल्याची किंमत 51.5 कोटी रुपये आहे.
राजच्या अगोदर अक्षय कुमारसोबत होते शिल्पाचे अफेयर...
राज कुंद्राच्या अगोदर शिल्पा शेट्टीचे अफेयर अक्षय कुमारसोबत होते. अक्षयने शिल्पासोबत लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. पण त्यादरम्यानच शिल्पाला कळले की, अक्षय तिला फसवत आहे. त्याचवेळी अक्षयचे अफेयर रवीनासोबतही चालू होते. हे कळाल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर शिल्पाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, अक्षयने तिचा यूज केला आणि स्वार्थ साधल्यानंतर तिला सोडून दिले. मात्र, आता दोघांचे संबंध सामान्य आहेत. अक्षय-शिल्पाने 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' (1994), 'इंसाफ' (1997), 'जानवर' (1999), 'धड़कन' (2000) अशा चित्रपटांत सोबत काम केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.