आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या स्वागतासाठी शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांनी सजवले घर, मित्रांसोबत पार्टी केली एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. शिल्पा शेट्टी तिची न्यू बोर्न बेबी समीशाला घरी घेऊन आली आहे. मुलीच्या आगमनानंतर शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते.  यावेळी शिल्पाने तिचे संपूर्ण घर सजविले आणि किड्स थीमवर केकही कापला. पार्टीचे काही फोटो शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यात सजावटीपासून मित्रांसोबतच्या  सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळत आहे.

15 फेब्रुवारी रोजी झाला मुलीचा जन्म

शिल्पा-राज यांची मुलगी समिशाचा जन्म 15 फेब्रुवारी रोजी झाला, परंतु तिने 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी मुलीच्या जन्माची बातमी शेअर केली. यानंतर शिल्पाने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि राज गेल्या 5 वर्षांपासून दुसर्‍या मुलासाठी प्रयत्न करीत होते. त्यांना मुलीची इच्छा होती. आणि 21 वर्षांपूर्वी तिने तिच्या नावाचा विचार केला होता. समीशाचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. याआधी दोघांनाही वियान नावाचा मुलगा आहे. वियानचा जन्म 2012 मध्ये झाला होता. शिल्पा-राज यांचे 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न झाले. शिल्पा ही राजची दुसरी पत्नी आहे.