आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 9 व्या वाढदिवशी शिल्पा शेट्टीने शेअर केला Kissचा फोटो, मालदीवमध्ये एन्जॉय करतेय हॉलिडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा बॉलिवूडचे प्रसिध्द कपल आहेत. हे दोघं नेहमी एकत्र स्पॉट होत असतात. शिल्पा बॉलिवूडपासून दूर राहत असली तरीही ती नेहमीच चर्चेत असते. शिल्पा फिटनेसविषयी खुप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. यासोबतच नेहमीच ती रियालिटी शोजमध्ये दिसत असते. शिल्पा आणि राजच्या लग्नाला 9 वर्षे झाले आहेत. या निमित्ताने शिल्पाने पती राज कुंद्रासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. 

 

शिल्पाने इंस्टाग्रामवर या फोटोला सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, 'तु दिलेले सरप्राइज आणि मोठे मन माझ्यासाठी खुप महत्त्वाचे आहे. तरीही मी काही गोष्टींसाठी तुझे आभार मानेल. आपण दोघं एकमेकांसाठी बनलो आहोत. जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत तुझ्यावर प्रेम करेल. जर त्यानंतरही काही आयुष्य असेल तरीही प्रेम करेल. लग्नाच्या नवव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

 

राज कुंद्राने केली अशी कमेंट 
शिल्पाच्या या रोमँटिक पोस्टनंतर राज कुंद्राने लगेच यावर कमेंट केली. त्याने लिहिले की, "अजून फक्त एका वर्षाने आपण लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा करु. असे वाटते की, मी कालच तुझ्याशी लग्न केले होते." शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. शिल्पाने वेटिंग अॅनिव्हर्सरीचे अनेक फोटोज शेअर केले आहे. यामधील एका फोटोमध्ये हे दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

 

शेअर केले बिकिनी फोटो 
शिल्पाने शेअर केलेल्या काही फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसतेय. शिल्पा आणि राज यांची पहिली भेट 2008 मध्ये झाली होती. त्यावेळी राज शिल्पाच्या परफ्यूम 'एस2' ला प्रमोट करत होता. तेव्हा दोघांची मैत्री झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाली. शिल्पा शेट्टीने बिझनेसमन राज कुंद्रासोबत 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केले होते. 

बातम्या आणखी आहेत...