आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shilpa Shetty Faces Racism At Sydney Airport, Narrates The Incident On Social Media

सिडनी एयपोर्टवर शिल्पा शेट्टीसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेला एक अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, गेल्या काही दिवसांपुर्वी सिडनी(ऑस्ट्रेलिया) एयरपोर्टवर तिला वर्णभेदाचा सामना करावा लागला. भडकलेल्या शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "यावर लक्ष द्यायला हवे... मी सिडनी मेलबर्न प्रवास करत होते. या दरम्यान चेकइन काउंटरवर मला मेल नावाच्या एक महिला भेटली, तिचे मानने होते की, आमच्यासोबत (कृष्णवर्णीय)सोबत उध्दटपणे बोलले जाते. मी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होते आणि माझ्याजवळ दोन बॅग होत्या. तिने जोर दिला आणि म्हणाली की, माझी अर्धी भरलेली बॅग ओव्हरसाइज होती. तिने आम्हाला दूस-या काउंटरवर पाठवले, येथे ओव्हरसाइज लगेज पाहिले जात होते. तिथे एक सज्जन महिला होती, ती म्हणाली की- ही बॅग ओव्हरसाइज नाही. जर तुम्ही दूस-या आउंटरवर मॅन्यूअली चेक करु शकत असाल तर प्लीज करा."


काउंटर बंद होण्यास फक्त पाच मिनिटे उरले होते 
- शिल्पाने पुढे लिहिले, "जेव्हा काउंटर बंद होण्यास 5 मिनिटे बाकी होते, तेव्हा हे सर्व होत होते. मी पुन्हा मेल जवळ पोहोचले आणि त्याच्या कलीगने सांगितल्याप्रमाणे तिला म्हणाले की, ही बॅग ओव्हरसाइज नाही. प्लीज जमा करु घ्या. पण तिने नकार दिला. मी तिला पुन्हा म्हणाल्यावर तिने माझ्यासोबत गैरवर्तन केले. आमच्याजवळ वेळ नव्हता, यामुळे आम्ही पळतच ओव्हरसाइज लगेज काउंटरवर गेलो आणि बॅग जमा करण्याची रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आमचे ऐकले."
- "महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही पोस्ट कुंतास एयरलाइंस(quantas airlines) साठी आहे. कारण त्यांना या घटना माहिती व्हाव्यात. त्यांनी त्याच्या स्टाफला मदत करणे शिकवले पाहिजे, तसेच वर्ण पाहून प्राथमिकताही देऊ नये. आम्ही लहान लोकं नाही आणि त्यांचे कठोर आणि रुड बोलणे सहन केले जाणार नाही हे त्यांना माहिती असावे. फोटो पाहून सांगा, माझी बॅग ओव्हरसाइज आहे का?"


यापुर्वीही वर्णभेदाची बळी ठरली आहे शिल्पा 
- शिल्पा शेट्टीसोबत यापुर्वीही वर्णभेद झाला आहे. तेव्हा ब्रिटेनमध्ये तिच्यासोबत ही घडना घडली होती. ही गोष्ट 2007 ची आहे. तेव्हा ती 'बिग ब्रदर'ची कंटेस्टेंट बनली होती. शो दरम्यान ब्रिटेनच्या जेड गुडीने शिल्पाच्या वर्णावर टिका केली होती. यानंतर खुप वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर जेडने माफी मागितली होती.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...