आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीने पंतप्रधान मोदींच्या 'स्वच्छ भारत अभियाना'वर उपस्थित केला प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. शिल्पा शेट्टी नुकतीच मुंबईच्या एका स्टूडियोबाहेर स्पॉट झाली. ती येथे फोटोग्राफर्सला पोज देत होती. परंतू पोज देण्यासाठी शिल्पा वॅनिटी वॅनमधून उतरुन स्टूडिओ परिसरात गेली, तेव्हा तिने अस्वच्छता पाहून नाक मुरडले. एवढेच नाही तर शिल्पाने तेथील अस्वच्छता पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वच्छ भारत अभियान'वर प्रश्न उपस्थित केले. 


शिल्पाचा अॅटीट्यूड पाहून सोशल मीडिया यूजर्स भडकले 
- अस्वच्छता पाहून शिल्पा शेट्टीचे नाक मुरडणे आणि नंतर 'स्वच्छ भारत अभियान'वर प्रश्न उपस्थित करणे सोशल मीडिया यूजर्सला सहन झाले नाही. शिल्पाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने तिला सल्ला दिला की, तु स्वच्छता करण्यात मदत करु शकत नाही तर तुला नाक मुरडण्याचा आणि स्वच्छ भारत अभियानावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. एका सोशल मीडिया यूजरने विचारले की, "एक नागरिक असल्याच्या नाते तुझी काही जबाबदारी नाही का?की फक्त पीएम आणि इतर लोकांनीच स्वच्छ भारत अभियानावर लक्ष ठेवावे? असो, सॉरी मी एका मॅच फिक्सरवर आपली एनर्जी वाया घालवत आहे." तर एका यूजरने कमेंट केली, "हिने नाक मुरडल्याने काहीच फरक पडत नाही. तिने आपल्या करप्ट पतीला वाचवावे." 2013 मध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राच्या आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला होता. त्यांना दोन वर्ष खेळण्यास मनाई करण्यात आलेली होती. 


शिल्पाने केली आहे स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात 
- शेल्पा शेट्टी 'स्वच्छ भारत अभियान'च्या एका स्वच्छता सर्वेक्षणाची ब्रांड एम्बेसडर राहिली आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये तिला एम्बेसडर बनवण्यात आले होते. स्वच्छता सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या 'शिल्पा बोल रही हूं' ही जाहिरात खुप प्रसिध्द झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...