आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Super Dancer Chapter 3 Audition: Shilpa Shetty Emotional Listen 9 Year Old Super Dance Contestant Tejas Varma Story And Decide To Pay His All Education Expresses

शिल्पाने ऐकली 9 वर्षांच्या मुलाची कहाणी तर अश्रू झाले अनावर, आता उचलणार त्याच्या शिक्षणाचा खर्च, म्हणाली- या मुलामध्ये आहे टॅलेंट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. डान्स रियालिटी शो 'सुपर डान्सर-3' सुरु झाले आहे. शोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये शिल्पा शेट्टी जज आहे. कोरियोग्राफर गीता कपूर आणि फिल्म डायरेक्टर अनुराग बसु एका मुलाचा डान्स पाहून इमोशनल होतात. हे पाहून शिल्पाही इमोशनल होते आणि तिला अश्रू अनावर होतात. खरेतर 'सुपर डान्सर-3' च्या फायनल ऑडिशन्समध्ये 9 वर्षांचा कंटेस्टेंट तेजल वर्मा ऑडिशन देण्यासाठी आला तेव्हा शोच्या तिन्ही जज त्याच्याकडे प्रभावत झाली. त्यांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिले. तेजसच्या डान्सने सर्वांनाच चकीत केले. तेजसचे कुटूंब स्टेजवर आल्यानंतर या आई-लेकाची स्टोरी ऐकल्यानंतर सर्वच लोक भावूक झाले. आईने सांगितले की, तेजस स्वतःच्या कमाईने त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. यासोबतच तो गेल्या 2 वर्षांपासून भावाचीही फीस भरतोय. तेजसच्या आईचे बोलणे ऐकून अनुराग बसु चकीत झाले. अनुराग म्हणाले की, हे जाणुन घेऊन दुःखी व्हावे की, अभिमान वाटावा हेच कळत नाही. मुलाची कथा ऐकून शिल्पा शेट्टी खुप भावूक झाली. ती म्हणाली, "या मुलामध्ये खुप टॅलेंट आहे, पण कधी-कधी प्रेशरमुळे टॅलेंट कमी होते." शिल्पाने तेजसच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर तेजने टॉप-12 मध्येही जागा नर्माण केली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...