आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shilpa Shetty Raj Kundra 8th Wedding Anniversary, Bollywood Actress Shilpa Shetty

Wedding Ann: शिल्पाला साखरपुड्याला मिळाली होती 3Crची अंगठी, 50 लाखांचा होता वेडिंग ड्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा आज त्यांच्या लग्नाचा नववाऔ वाढदिवस साजरा करत आहेत. 22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पा आणि राज लग्नगाठीत अडकले होते. शिल्पाचे लग्न 2009 मध्ये बॉलिवूडमधील मोठा इव्हेंट ठरला होता. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा येथील बावा व्हिलामध्ये शिल्पा-राजचा शाही लग्नसोहळा रंगला होता. मेंदीपासून ते संगीत, लग्न आणि रिसेप्शनपर्यंत या सेलिब्रिटी कपलच्या रॉयलनेसची झलक बघायला मिळाली होती.

 

अनेक गोष्टींमुळे शिल्पा आणि राजच्या लग्न आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. या गोष्टी होत्या आकर्णाचा केंद्रबिंदू...


- साखरपुड्याला राज कुंद्रा यांनी शिल्पाला 3 कोटींची अंगठी घातली होती. या अंगठीवर 20 कॅरेटचा हार्ट शेपचा डायमंड लागला होता.
- तर लग्नात शिल्पाने परिधान केलेल्या लहेंग्याची किंमत तब्बल 50 लाख रुपये होती. या लहेंग्यावर आठ हजार महागडे क्रिस्टल लावण्यात आले होते. 
- लग्नात शिल्पाने कुंदन ज्वेलरी घातली होती. लहेंग्यासोबतच तिची ही ज्वेलरीसुद्धा खूप आकर्षक होती. अनमोल ज्वेलर्सच्या या ज्वेलरीवर डायमंड आणि एमरॉल्डसह अनेक महागडे स्टोन लावण्यात आले होते.

- शिल्पासाठी डिझायनर तरुण ताहिलानी यांनी वेडिंग ड्रेसेस डिझाइन केले होते. तर शांतनू-निखिल यांनी राज कुंद्रासाठी वेडिंग ड्रेसेस डिझाइन केले होते. 
- लग्नानंतर मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिल्पा-राजचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. 
- रिसेप्शनवेळी शिल्पा आणि राजने तब्बल 80 किलोंचा केक कापला होता. 
- शिल्पाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज आणि प्रसिध्द स्टार्स उपस्थित होते. पार्टीमध्ये मोनिका बेदी, मान्यता दत्त, संजय दत्तसुध्दा सामील होते. माधनव आपल्या पत्नीसह पार्टीत पोहोचला होता. जुही चावला पतीसह दिसली होती. या सर्व स्टार्ससह बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसुध्दा पार्टीत पोहोचला होता.


मॉडेलिंगद्वारे शिल्पाने केली होती करिअरची सुरुवात...
शिल्पा शेट्टीने दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. तिने करिअरच्या सुरुवातीला कमर्शिअल अॅडमध्येही काम केले. शिल्पाने 1992 मध्ये 'गाता रहे मेरे दिल' हा चित्रपट साइन केला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणासुद्धा सुरुवात झाली होती. पण काही कारणास्तव हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 1993 साली आलेल्या 'बाजीगर' द्वारे शिल्पाची सिनेसृष्टीत एन्ट्री झाली. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल लीड रोलमध्ये होते. शिल्पाने 'आग' (1994), 'हथकडी' (1995), 'हिम्मत' (1996), 'औजार' (1997), 'धडकन' (2000), 'रिश्ते' (2002), 'दस' (2005), 'लाइफ इन मेट्रो' (2007) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. ती अखेरची 2007साली आलेल्या 'अपने' या चित्रपटात झळकली होती. 2014 साली तिने 'ढिश्कियाऊं' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. सध्या ती सोनी टीव्हीच्या 'सुपर डांसर' या डान्स रिअॅलिटी शोची जज म्हणून झळकत आहे.


आज शिल्पा-राजच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाची निवडक छायाचित्रे या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा शिल्पा-राजच्या शाही लग्नसोहळ्याची एक छोटीशी झलक...

बातम्या आणखी आहेत...