आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवस फेडण्यासाठी शिल्पा शेट्टी साई दरबारी: बाबांच्या चरणी सुवर्णमुकुट अर्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी -  सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी गुरुवारी सहकुटुंब साईदर्शन घेतले. तसेच एक सुवर्णमुकुटही अर्पण केला.‘साईबाबांची मी निस्सीम भक्त असून बाबांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण झाल्या असून त्यांनी आयुष्यात सर्वकाही दिले अाहे,’ अशी प्रतिक्रिया तिने दर्शनानंतर दिली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांची धूपारती केली. 


साईदर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी सत्कार केला. या वेळी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप उपस्थित होते.शिल्पा म्हणाली, ‘साईबाबांची आमच्या कुटुंबावर मोठी कृपा असून बाबांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने मी यश संपादन करू शकले. साईबाबांवर माझी मोठी श्रद्धा असून यापूर्वी मी बाबांच्या 
दर्शनासाठी आले असताना बाबांना एक नवस केला होता. तो नवस पूर्ण झाल्याने आज साईदर्शनासाठी आले असून साई समाधी शताब्दीनिमित्त बाबांच्या चरणी सुवर्णमुकुट अर्पण केला.’

बातम्या आणखी आहेत...