आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या तायक्वांदो कॉम्पीटीशनमध्ये पोहोचली शिल्पा शेट्टी, 6 वर्षांच्या वियानने जिंकले गोल्ड आणि सिल्वर मेडल, शिल्पाने खुश होऊन केला व्हिडीओ, म्हणाली, आम्हाला खुप अभिमान आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिल्पा शेट्टीने अशातच आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर मुलगा वियानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये वियान शाळेत तायक्वांदो खेळताना दिसत आहे. 6 वर्षांच्या वियानने पहिल्यांदा शाळेच्या तायक्वांदो स्पर्धेत भाग घेतला. खास गोष्ट म्हणजे शिल्पाच्या मुलाने आपल्या कॉम्पीटीटरला हरवून गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकले. शिल्पा वियानची ही मॅच पाहण्यासाठी पती राज कुंद्रासोबत आली होती. तीने मुलाच्या विजयाच्या आनंदात व्हिडीओही शेयर केला आणि स्वतःला प्राऊड पॅरेंटदेखील म्हणाली. वियानने आपल्या विजयासाठी टायगरचे आभार मानले. वियान टायगरचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याच्याकडूनच इंस्पायर होऊन वियान बऱ्याचदा स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतो.
बातम्या आणखी आहेत...