Home | Gossip | shilpa shetty shows little farm inside her house area

शिल्पा शेट्टी घरामागे छोट्याशा जागेत करते शेती, उगवते वांगी, मेथी, पालक सारख्या भाज्या, बगिच्यांतून भाज्या तोडताना तिच्याकडून झाली एक चूक, व्हिडीओ पाहून यूजर्स देत आहेत सल्ला 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 11, 2019, 02:24 PM IST

ऑरगॅनिक शेती करते शिल्पा, सांगितले घरात का गरजेचा आहे बगीचा... 

  • एंटरटेनमेंट डेस्क : शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, तिने बगिच्यात वांगी, पालक, मेथी, मिर्ची अशा भाज्या लावल्या आहेत. एवढेच नाही तर तिने काही फळेही लावली आहेत. बऱ्याच भाज्या तिने कुंड्यांमध्ये लावल्या आहेत. हे गार्डन तिने आपल्या घरामागे छोट्याशा जागेत तयार केले आहे. शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा बगिच्यांतून वांगी, मिर्ची आणि मैथी तोडताना दिसत आहे. मात्र, भाज्या तोडताना शिल्पाकडून एक चूक झाली. चूक ही झाली की, ती भाज्या हाताने तोडण्याऐवजी कात्रीने कप्तान दिसते. व्हिडीओ पाहून यूजर्स तिला सल्ला देत आहेत. एक जण म्हणाला, 'भाज्या कात्रीने कपात नसतात.' एक यूजर म्हणाला, 'वांगी हाताने तोडा कात्रीने नाही.' एकाने कमेंट करत लिहिले, 'हे सेलिब्रिटीज कात्रीने भाज्या तोडतात आणि असे दाखवतात जसे काही डायमंड मिळाले आहे.'

    व्हिडीओ शेयर करून शिल्पाने कॅप्शन लिहिले, 'ईच्छा तिथे मार्ग. माझ्याकडे फार्म नाहीये तरीही मी पेस्टिसाइट यूज न करता ऑरगॅनिक शेती करत आहे आणि तेही कुंडीमध्ये. माझ्याकडे वांगी, पालक, मेथी, मिर्ची, टोमॅटो सारख्या भाज्या आहेत.' शिल्पाने सांगितले, 'तुमच्याकडे गार्डन आणि लायब्ररी आहेत तर समजा तुमच्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे मी घराच्या पाठीमागे एक छोटासा बगीचा बनवला आहे.'

Trending