आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo : इंडस्ट्रीते रेप किंवा बळजबरी काही नसते, सगळं सामंजस्याने घडतं असतं - बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः देशभरात सध्या #MeToo अभियानाची चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्यासोबत घडलेली आपबिती सांगत आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक या अभियानाला समर्थन देताना दिसत आहे. तर 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिचे मात्र यासंदर्भात काही वेगळेच म्हणणे आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने #MeToo अभियानाला काहीच अर्थ नसल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली, 'ज्या वेळी एखादी घटना घडते, त्याचवेळी त्याला वाच्यता फोडायला हवी. नंतर बोलून काही अर्थ नसतो.' महिलाओंच्या सेक्शुअल हरॅसमेंटविषयी शिल्पा म्हणणे आहे, ''इंडस्ट्रीत बलात्कार किंवा बळजबरी असा काही प्रकार होत नसतो, जे घडतं ते दोघांच्याही सहमतीने घडतं असते.''


नंतर आवाज उठवल्याने होतो फक्त वाद... 
शिल्पा पुढे म्हणाली, मी स्वतः याचा धडा घेतला आहे. जेव्हा तुमच्यासोबत काही वाईट घडतं, तेव्हाच त्याच्याविषयी आवाज उठवायला हवा. नंतर बोलून काही फायदा होत नसतो, सगळं काही व्यर्थ असतं. नंतर आवाज उठवून कुणीही तुमचे म्हणणे ऐकत नाही. फक्त त्यावरुन वादाला तोंड फुटतं असतं." शिल्पा म्हणाली, ''इंडस्ट्री जे घडतं ते सामंजस्याने घडतं असतं. जर तुम्ही यासाठी तयार नसाल, तर मग सर्वकाही सोडून देण्याची तुमची तयारी असायला हवी.''

 

भूमिकेसाठी तोकड्या कपड्यांची नव्हे तर टॅलेंटची गजर असते...
शिल्पा म्हणाली, एकदा सेटवर एक तरुणी शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. जेव्हा मी तिला विचारले की, तू एवढ्या तोकड्या कपड्यांत येथे का आली, त्यावर ती म्हणाली की ती मीटिंगसाठी येथे आली आहे. यावर मी तिला म्हटले, तू येथे टीव्ही शोसाठी आली आहेस, मग लीड रोलसाठी कशा कपड्यांची गरज असते, हे तुला ठाऊक नाही का? मी तिला सांगितले की, कामासाठी तोकड्या कपड्यांची नव्हे तर टॅलेंटची गरज असते.

 

इंडस्ट्रीत सर्वच वाईट आहे, असे नाही...
या इंडस्ट्रीला जसे सादर केले जाते, त्यानुसार ती चांगलीही नाही आणि वाईटही नाही. प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात. लोक फक्त इंडस्ट्रीचे नाव का बदनाम करतात, हे मला ठाऊक नाही. येथे सगळेच लोक वाईट आहेत, असे नाहीये. हे सर्वस्वी आपल्यावर  अवलंबून असतं. समोरचा तुमच्यासमोर कसा रिअॅक्ट होते, हे तुमच्या वागण्यावर अवलंबून असतं. हे सर्वकाही गिव्ह अँड टेक पॉलिसीसारखे आहे.  

बातम्या आणखी आहेत...