आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणात येताच ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे, हे दोन कॉमेडियनही लवकरच राजकारणात येणार असल्याच्या चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 'भाभीजी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये सहभागी झाली आहे. मंगळवारी ती मुंबईत पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली. काँग्रसेचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपमदेखील या वेळी उपस्थित होते. शिल्पा राजकारणात आल्याची बातमी येताच लोकांनी तिला ट्रोल करणे सुरू केले. खरं तर, शिल्पाचे वडीलदेखील काँग्रेसमध्येे हाेते. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. त्यामुळेच शिल्पाने काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केला. 

 

शिल्पाच्या आधी टीव्ही इंडस्ट्रीतून कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक सारखे अभिनेतेदेखील राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही कलाकार काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची योजना आखत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या रूपात ते मुंबईवरून २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवताना दिसणार आहेत. शिल्पा शिंदे म्हणाली..., 'हाे, मी पक्षात सहभागी होत आहे. त्यानंतर मला कुठून निवडणूक लढवायची आहे, याचे चित्र स्पष्ट होईल.' कृष्णानेदेखील राजकारणात येण्याच्या बातमीला दुजारो दिला आहे. 

 

राजकारणात आलेले टीव्ही कलाकार 
नितीश भारद्वाज :
1988 मध्ये दूरदर्शनवर सर्वात लोकप्रिय सिरीज 'महाभारत' मध्ये भगवान कृष्णाचे पात्र साकारले हाेते. त्यानंतर नितीश सर्वात लोकप्रिय अभिनेते झाले होते. टीव्हीमधून ब्रेक घेऊन ते राजकारणात आले. त्यांनी भाजपकडून मध्य प्रदेशच्या राजगढ आणि जमशेदपूरमधून संसदीय निवडणूक लढवली. १९९६ मध्ये जमशेदपूरमधून संसद सदस्याच्या रूपात लोकसभेसाठी निवड झाली. 1999 मध्ये राजगढमधून लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. २००६ मध्ये नितीश यांनी पक्ष सोडला. 


गुल पनाग : माजी सौंदर्यवती, टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री गुल पनागने अनेक मालिकांत काम केले. त्यानंतर तिने आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याच्या रूपात राजकारणात प्रवेश केला. २०१४ मध्ये तिने चदिगडमधून निवडणूक लढवली. 


जावेद जाफरी : जावेद जाफरीलादेखील आम आदमी पार्टीने तिकीट देऊन लखनऊमधून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मैदानात आणले होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासमोर ते टिकले नाहीत. 


शेखर सुमन : २००९ मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यावर्षी निवडणुकीत पार्टीने त्यांना भाजपच्या शत्रुघ्न सिन्हा विरुद्ध मैदानात उतवरले होते. 

 

कपिल शर्मानेदेखील नुकतेच मनमोहनसिंग आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धू कपिलला राजकारणात आणण्यासाठी उत्सुक होते. कपिलच्या चाहत्याची संख्या जास्त आहे. त्याचा त्याला फायदा होऊ शकतो. यांच्या आधीदेखील अनेक टीव्ही कलाकार आणि सिने इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार राजकारणात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...