आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा> जन्म : १९७१ > शिक्षण- अलीगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयएम अहमदाबाद > जबाबदारी- एयर इंडियाचे स्वतंत्र संचालक डॉ. सय्यद जफर इस्लाम हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर पक्षाची बाजू माध्यमांसमोर मांडतात. बातमीचे केंद्रबिंदू असूनही स्वत: कधी बातमीचा विषय होत नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा डॉ.जफरही त्यांच्यासोबत होते. तर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी शिंदे जेव्हा पक्ष कार्यालयात गेले तेव्हाही जफर त्यांच्यासोबत होते. वृत्तांनुसार, डॉ. सय्यद जफर गेल्या पाच महिन्यांपासून शिंदेंसोबत याबाबत चर्चा करत आहेत. दोघेही जुने मित्र असून एकमेकांना अनेक काळापासून ओळखतात. डॉ. सय्यद जफर इस्लाम २०१३ पूर्वी प्रकाशझोतात नव्हते. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पदवीधर आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केल्यानंतर ते बँकिंग क्षेत्रात आले. दोन दशकांच्या आपल्या कारकीर्दीत अनेक भूमिका निभावल्या. ड्यूश बँकेच्या एमडी पदावरही नियुक्ती झाली. डॉ.जफर यांची पत्नीही बँकर आहे. एका लेखात जफर यांनी लिहिले होते की, २०१३ पूर्वी त्यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता. मात्र त्यांना यात स्वारस्य होते. विद्यापीठ आणि नंतर आयआयएममध्ये शिक्षण घेत असताना त्यांना देशापुढील समस्यांमध्ये आर्थिक समस्यांचाही समावेश असल्याचे कळाले. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयानंतर जफर यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. जफर यांनी एका लेखात लिहिले की, सुरुवातीला अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली. मात्र कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान नरेंद्र मोदींसोबत त्यांची भेट झाली. मोदींनी त्यांना राजकारणात येण्यासाठी प्रेरित केले. उमेदवारीसाठी राजकारणात येत असाल तर येऊ नका, असे मोदी त्यांना म्हणाले होते. जफर सांगतात की, भाजपमध्ये प्रवेशानंतर सर्वाधिक अडचण कुटुंबाची समजूत काढण्यात आली. शेजारी शत्रू समजायला लागले होते. तसेच चांगली नोकरी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याने मित्रांनाही आश्चर्य वाटले होते. मात्र काळानंतर त्यांचे विचारही बदलत गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.