आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

101 वर्षांपासून नायग्रा वॉटर फॉल्समध्ये अडकलेली नाव पाण्यासोबत गेली वाहून, इतक्या वर्षांपासून लोक याला मोठा दगड समजायचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- जग विख्यात नायग्रा वॉटर फॉल्समधील दगडांमध्ये मागील 101 वर्षांपासून अडकलेली मोठी नाव जोराचा वारा आणि पाण्याच्या वेगाने शनिवार वाहून गेली. नाव अमेरिकेकडून कॅनडाकडे वाहत जात आहे. ही नाव 1918 मध्ये नायग्रा फॉल्समध्ये अडकली होती.


रिपोर्टनुसार, नावेतून दोन जण सेंट लॉरेंस नदीतून जात होते. या दरम्यान वातावरण बिघडले आणि नाव धबधब्याच्या किनाऱ्यावर जाऊन अडकली. लाकूड आणि लोखंडापासून तयार झालेली ही नाव इतक्या वर्षात जीर्ण झाली, त्यामुळे नावेला लोक मोठा दगड समजायचे. 

जगातील सर्वात सुंदर धबधबा
 
नायग्रा वॉटर फॉल्स अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर आहे. सेंट लॉरेंस नदीवर असलेला नायग्रा फॉल्स कॅनडाच्या ओंटारियो आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या नायग्रा रिव्हर कोर्समध्ये आहे. हा जगातील सर्वात सुंदर धबधबा आहे.

बातम्या आणखी आहेत...