आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंच्या झाेळीत 689.43 काेटी दान; गतवर्षीपेक्षा 83 काेटी जास्त; पायाभूत सुविधांसाठी 608 काेटी 40 लाखांचा खर्च

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

नवनाथ दिघे

शिर्डी : सर्वधर्मसमभावाचा संदेश जगाला देणाऱ्या श्री साईबाबा संस्थानच्या वार्षिक अहवालाला राज्य विधिमंडळाने मान्यता दिली असून २०१९-२० या वर्षात साईबाबांच्या तिजोरीत सुमारे ६८९.४३ कोटी उत्पन्न जमा झाले असून त्या उत्पन्नातून साई भक्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प व पायाभूत सुविधांसाठी सुमारे ६०८ कोटी ४० लाख खर्च करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. २०१८ वर्षाच्या तुलनेत २०१९ साली ८३ कोटीचे अधिक दान साईंच्या झोळीत जमा झाल्याचे साई संस्थानच्या या ताळेबंदात नमूद करण्यात आले आहे.

‘सर्वधर्मसमभाव व श्रद्धा आणि सबुरी’ हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीला दररोज लाखो भाविक येतात. वर्षाकाठी हीच संख्या तीन कोटींच्यावर पोहचली असल्याने देशातील सर्वाधिक धार्मिक पर्यटनाचे सर्वात मोठे देवस्थान म्हणून साईबाबांच्या शिर्डीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने केली आहे. २०१८ साली साईबाबा समाधी शताब्दी वर्षें मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात आले असून या समाधी शताब्दी वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात अाला. विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सेलिब्रिटी, क्रिकेटर, उद्योगपती यांच्यासह देश विदेशातील करोडाे भाविकांचे साईबाबा श्रद्धेचे स्थान आहे. शिर्डीत साईबाबांच्या चरणी भरभरून दानही देतात. या दानातून पायाभूत सुविधा, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांसह आरोग्य सेवेसाठी खर्च केला जातो. आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालय मुख्य आकर्षण ठरले असून दररोज ७० हजार भाविक प्रसादाचा मोफत आनंद घेतात. साईबाबांच्या झोळीत जमा होत असलेल्या दानातून २२३७ कोटी रुपयांच्या ठेवी बँकांमध्ये जमा आहेत. २०१९ साली पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ७८ लाख, स्वच्छतेसाठी ३ कोटी, निवास व्यवस्थेवर २८ कोटी ३५ लाख, प्रसादालयावर ७६ कोटी २४ लाख, शैक्षणिक सुविधांवर १३ कोटी ९५ लाख तर गोरगरीब रुग्णांसाठी १२२ कोटी ३९ लाख खर्च करण्यात आला.

अधिनियम २००४ नुसार देण्यात आलेले अनुदान

 • वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ(एमआरआय मशीन खरेदीसाठी) (१३ कोटी)
 • इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (यंत्रसामुग्री खरेदीसाठी) (३५ कोटी २८ लाख)
 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद ( एमआरआय मशीन खरेदीसाठी) (१५ कोटी)
 • भवानीमाता सेवा समिती नागपूर साहित्य खरेदी (२ कोटी ३५ लाख)
 • जिल्हा सैनिक कार्यालय नगर (ध्वजनिधी - ९७ लाख ३१ हजार ४७०)
 • मुख्यमंत्री सहाय्यता निधी केरळ पूरग्रस्त (५५ कोटी)
 • जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधकाम (१० कोटी)
 • राकेश दामके साईभक्त वारसास मदत २५ हजार)
 • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना सल्लागार फी (२३ लाख ८१ हजार)
 • शिर्डी नवीन बसस्थानक उर्वरित काम (५५ लाख ४१ हजार ११८)
 • नगरपंचायत अंतर्गत रस्ते, जमीन अधिग्रहण, स्वच्छता (४४ कोटी १७ लाख ४१ हजार १२४)
 • गरीब रुग्णांना मदत (१ कोटी ६१ लाख ५८ हजार ५९३)
 • गरजूंच्या वैद्यकीय बिलात सवलत (८ कोटी ६० लाख ३७ हजार ९५७)

२०१८-१९ या वर्षात जमा झालेले दान

 • दक्षिणा पेटी (१७० कोटी ९ लाख)
 • गुंतवणुकीवरील व्याज (१५१ कोटी ७६ लाख)
 • सर्वसाधारण देणगी (९५ कोटी ४६ लाख)
 • अन्नदान निधी (७२ कोटी ७१ लाख)
 • रुग्णालय देणगी (६५ कोटी ३८ लाख)
 • प्रसादालय देणगी (४७ कोटी ७० लाख)
 • इमारत दुरुस्ती व देखभाल देणगी (२६ कोटी ९३ लाख)
 • वस्तुरूप देणगी (७ कोटी ५५ लाख)
 • वैद्यकीय निधी (१३ कोटी ६८ लाख)
 • शैक्षणिक निधी (११ कोटी ४० लाख)
 • साई समाधी शताब्दी निधी (१ कोटी ८५ लाख)
 • शैक्षणिक जमा (२ कोटी ४७ लाख)
 • धार्मिक निधी (१ कोटी ५ लाख)

२०१८-१९ या वर्षात खर्च

 • वेतन व भत्ते (१३६ कोटी ८९ लाख)
 • रुग्णालय उपक्रम (१०२ कोटी १७ लाख)
 • प्रसादालय खर्च (६ कोटी २४ लाख) {कंत्राटी कर्मचारी वेतन (८ कोटी ६२ लाख)
 • इमारत दुरुस्ती देखभाल (२८ कोटी ३६ लाख)
 • इतर दुरुस्ती व देखभाल खर्च (१० कोटी ७३ लाख)
 • नगरपंचायत व इतर अनुदाने (७६ कोटी ५४ लाख)
 • चल मालमत्तेवरील भांडवली खर्च (४९ कोटी ८ लाख)
 • वैद्यकीय अनुदाने (१८ कोटी ६० लाख)
 • शैक्षणिक उपक्रम (१३ कोटी ९५ लाख)
 • पुस्तके, दैनंदिनी, फाेटो, दिनदर्शिका छपाई (४ कोटी ५८ लाख)
 • धार्मिक विधीवर खर्च (२ कोटी ९२ लाख)
 • साई समाधी शताब्दी खर्च (६ कोटी ९६ लाख)
 • वैद्यकीय अनुदाने (१ कोटी ६२ लाख)
बातम्या आणखी आहेत...