आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईबाबावरील टीका अनाठायी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारच्या अंकातील आपले ‘तुका म्हणे ऐसे, मावेचे मर्इंद...’ संपादकीय अप्रतिम आहे. शंकराचार्यांच्या विधानावर अवाजवी टीका न करता आपण त्यांच्या दोषांवर अचूक बोट ठेवले आहे. खरे म्हणजे त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करून उगीचच रोष ओढवून घेतला आहे. त्यांच्या सारख्या उच्च स्थानी असलेल्या व्यक्तीने बोलताना संयमाने बोलणे आवश्यक असते. साईबाबा आणि गजानन महाराज हे समकालीन संत लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांची शिकवण ही जातपात, धर्म यांच्या पलीकडची होती. श्री साईबाबांची श्रद्धा, सबुरीची शिकवण जीवनात धीर देणारी आहे. साईबाबा हे कोणी भोंदू संत नव्हते. भोंदू संतावर तर तुकारामांनीदेखील टीकेचे प्रहार केले आहेत. तेव्हा अशा उच्च स्थानी असणार्‍या व्यक्तीनी जबाबदारीचे भान ठेवून वागले व बोलले पाहिजे. त्यांच्या वक्तव्याने देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. यामुळे लोकांत अस्वस्था निर्माण होऊन त्यांनी निदर्शने केली. आपल्या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे.