साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना / साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

राज्य सरकारच्या नियमाप्रमाने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय साई संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Feb 27,2019 10:02:00 AM IST

शिर्डी - राज्य सरकारच्या अधिपत्याखालील श्री साईबाबा संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या नियमाप्रमाने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय साई संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी मंगळवारी दिली.


हावरे म्हणाले, समाधी शताब्दी वर्षाच्या काळात साईसंस्थानच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. सध्या संस्थान अस्थापनेवरील कायम सेवेतील दोन हज़ार कर्मचाऱ्यांवर वर्षाकाठी ६० कोटी ख़र्च होत आहेत. सातव्या वेतन आयोगामुळे त्यात वर्षाकाठी २० कोटींची भर पडणार आहे. या निर्णयाला राज्य सरकारची तातडीने मंजुरी घेऊन वेतन आयोग तातडीने लागू करण्यात येणार आहे. फरकाची एकरकमी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

X