आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीची विमानसेवा सलग चौथ्या दिवशीही ठप्प, चार दिवसांत येणारी व जाणारी ८४ विमाने रद्द  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेपरगाव - ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित दृश्यमानता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानांचे उड्डाण बंदच आहे. त्यामुळे येणारी ५६ व जाणारी ५६ अशा ११२ विमानांची सेवा बंदच राहिली. साेमवारीही ही सेवा सुरू हाेईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. विमानतळ प्रशासनाकडूनही त्याबाबत सांगण्यात आले नाही. 

गुरुवारपासून शिर्डीतील विमानसेवा ठप्प झाल्यामुळे काही विमाने औरंगाबादेत उतरवण्यात आली हाेती. त्यानंतरही रविवारपर्यंत दृश्यमानतेची अडचण शिर्डी विमानतळावर कायम राहिली. त्यामुळे चाैथ्या दिवशीही सेवा ठप्पच हाेती. शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. शनिवारी येणारी १४ व जाणारी १४ अशी २८ विमानांची सेवा बंद राहिली आहे. त्यामुळे देश-विदेशातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण झाली आहे. अनेकांना आपला पूर्वनियाेजित प्रवास रद्द करावा लागला, तर काहींनी औरंगाबाद, पुण्यापर्यंत येऊन नंतर रस्ते मार्गाने शिर्डी गाठली.