आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवभोजन थाळीचा वाढला 'भार', 1 रुपयात आरोग्य तपासणी हद्दपार, तिजोरीतील खडखडाटाने ठाकरे सरकारची गोची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आजारावर निदानासाठी केवळ १ रुपयात आरोग्य तपासणी ही योजना तिजोरीत खडखडाट असल्याने गुंडाळण्याची वेळ आघाडी सरकारवर आली. सेनेच्या वचननाम्यात ही योजना असून राष्ट्रवादीची इच्छा असूनही निधीअभावी योजनेला ग्रहण लागले.

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली. त्यानंतर १० रुपयांत शिवभोजन थाळी आली. यात स्टॉल चालवणाऱ्याना थाळीमागे ४० रुपये अनुदान आहे. यामुळे तिजोरीवर अतिरिक्त भार आला. राज्यावर सध्या सुमारे ६ लाख कोटी कर्जाचा डोंगर आहे. त्यात शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्याने गरिबांसाठी असलेली आरोग्य योजना अडचणीत आली आहे.

नवीन योजनेसाठी निधीची कमतरता : राजेश टोपे

१ रुपयात आरोग्य तपासणी योजना अतिशय चांगली आहे. ती राबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचीसुद्धा तीव्र इच्छा आहे. आरोग्यमंत्री म्हणून ही योजना सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, निधीची कमतरता असल्याने तूर्त ती राबवली जाऊ शकत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...