maharashtra special / शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन


काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या

प्रतिनिधी

Jul 21,2019 08:41:00 AM IST

पुणे-ग्रामीण भागातील विद्याार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी गेली चार दशके काम केलेल्या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई बळवंत पुरंदरे (८६) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. तर पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत.


काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. विद्याार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई यांनी योगदान दिले होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

X
COMMENT